शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बसच्या धडकेने महिला ठार मुलगा-मुलगी गंभीर

By admin | Updated: May 29, 2014 01:27 IST

संतप्त जमावाने बस पेटवली; कडगाव येथील घटना

गडहिंग्लज : भरधाव जाणार्‍या ट्रॅव्हल बसने स्प्लेंडर दुचाकीला उडवल्यामुळे दुचाकीवरील रेखा शंकर कुरुणकर (वय ४५) ही महिला जागीच ठार झाली, तर तिचा दुचाकीचालक मुलगा अमर (१८, रा. कडगाव, ता. गडहिंग्लज) व दुचाकीवर मागे बसलेली तिची विवाहित मुलगी अपर्णा विजय मस्कर (२१, रा. हसूर, ता. कागल) हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रॅव्हल बस पेटवून दिली. गारगोटी-गडहिंग्लज मार्गावर कडगावनजीक जखेवाडी फाट्यावर आज, बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कडगाव येथील कुरुणकर यांचे घर जखेवाडी रोडवर आहे. मोठ्या मुलीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा बाजारासाठी रेखा व अपर्णा या दोघीही अमरच्या दुचाकी (एमएच ०९ एवाय ३३९०)वरून गावात येत होत्या. दरम्यान, गारगोटीहून गडहिंग्लजकडे भरधाव येणार्‍या स्वामी ट्रॅव्हल्सच्या (एमएच ०४ एफके १८८३) या बसने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिल्यामुळे पाठीमागे बसलेल्या रेखा डांबरी रस्त्यावर आपटल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी बसखाली अडकून फरफटत गेल्यामुळे अमर व अपर्णा यांच्या डोक्याला, चेहर्‍याला व हाता-पायांना गंभीर दुखापत झाली. अपर्णा हिच्यावर कोल्हापूर येथे, तर अमर याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग विझविण्यासाठी गडहिंग्लज नगरपालिकेची अग्निशामक गाडी बोलावण्यात आली. मात्र, अग्निशामक नादुरुस्त असल्यामुळे उपलब्ध झाले नाही. त्यामुळे गावकर्‍यांनी गडहिंग्लजहून खासगी टँकर मागवला. मात्र, तो टँकरदेखील नादुरुस्तच असल्यामुळे धक्के मारतच त्यालाही घटनास्थळी नेऊन आग विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न ग्रामस्थांनी केला. दहाच्या सुमारास संकेश्वर येथून कर्नाटक सरकारची अद्ययावत अग्निशामक गाडी व पथक आले. तोपर्यंत ट्रॅव्हलचा कोळसा झाला होता. घटनास्थळी डीवायएसपी अशोक भरते, तहसीलदार हनुमंत पाटील यांनी भेट दिली. अमरच्या फिर्यादीवरून अपघाताची पोलिसांत नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक रामदास इंगवले अधिक तपास करीत आहेत. गतिरोधक नसल्यामुळेच अपघात कडगाव गावाबाहेरून काढण्यात आलेल्या बायपास रस्त्यावरून ट्रॅव्हलसह बहुतेक वाहने भरधाव असतात. जखेवाडी फाट्यावरच गेल्यावर्षी कडगावच्या दत्ता पाटील यांची ट्रॅक्स ट्रॅव्हलने उडवली होती. पाच-सहा दुचाकीस्वारांनाही ट्रॅव्हलने याच पद्धतीने उडवले. मात्र, सुदैवाने त्यावेळी जीवितहानी झाली नव्हती. आजच्या घटनेत शेतमजूर महिला जागीच ठार झाल्यामुळे जमावाच्या संतापाचा उद्रेक झाला. जखेवाडी-कडगाव आणि उत्तूर-गडहिंग्लज या मार्गावरील जखेवाडी फाट्यावर गतिरोधक नसल्यामुळेच वारंवार अपघात होतात, अशी चर्चा घटनास्थळी होती. महागावच्या घटनेची आठवण वर्षापूर्वी गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील हुनगिनहाळनजीक रस्त्यालगतच्या विहिरीत ट्रॅव्हल बस कोसळून चालक आणि वाहकाचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यानंतर गडहिंग्लज कारखान्यासमोर चंदगड आगाराच्या बसने महागावच्या दुचाकीस्वार तरुणाचा बळी घेतला. त्यावेळीही संतप्त जमावाने बस पेटवली होती. त्या घटनेची आज पुन्हा आठवण झाली. (प्रतिनिधी)