शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बालिका खून प्रकरणाचे धागेदोरे कोल्हापुरात

By admin | Updated: July 25, 2016 00:34 IST

आरेतील तरुणाची चौकशी : मध्यप्रदेशचे पोलिस तळ ठोेकून

कोल्हापूर : मध्यप्रदेश येथील दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणाचे धागेदोरे कोल्हापूरपर्यंत पोहोचल्याने मध्यप्रदेश येथील सोंडवा पोलिस ठाण्याचे विशेष पथक रविवारी कोल्हापुरात दाखल झाले. या पथकाने आरे (ता. करवीर) येथील तुकाराम नावाच्या तरुणाकडे कसून चौकशी केली. मध्यप्रदेशमधील ग्रामहातवी (जि. आलेझापूर) येथे २०१२ मध्ये सैन्यदलात अधिकारी असलेल्या हरसिंग दौडवा यांच्या दहा वर्षांच्या मुलीवर या नराधमाने अत्याचार करून गळा दाबून खून केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुप्तचर विभागा (सीबीआय)कडे देण्यात आला होता. बालिका खून प्रकरणातील मारेकरी आजअखेर सापडलाच नाही. सोंडवा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पी. भूरया व हवालदार आर. पानसिंह सोलंकी हे याप्रकरणी तपास करीत आहेत. त्यांनी बालिकेचा ज्याठिकाणी खून झाला होता, त्या परिसरातील मोबाईल लोकेशन तपासले असता आरे (ता. करवीर) येथील तरुणाचे लोकेशन मिळून आले. मोबाईल नंबरवरून त्याचे नाव, पत्ता मिळवून एक विशेष तपास पथक रविवारी कोल्हापुरात दाखल झाले. या पथकाने करवीर पोलिसांशी संपर्क साधून आरे येथील ‘तुकाराम’ नावाच्या तरुणाकडे कसून चौकशी केली. चौकशीतील तपशील सांगण्यास मात्र या पथकाने नकार दर्शविला.