स्पर्धेत इलेव्हन आर्मी संघास द्वितीय, तर एस. पी. स्पोर्ट्स तृतीय व एस. ए. वॉरिअर्सचा चतुर्थ क्रमांक आला. अंतिम सामन्यात सामनावीर गजानन गुरव, उत्कृष्ट फलंदाज इम्रान नायकवडी, उत्कृष्ट गोलंदाज संतोष घाटगे, मालिकावीर गजानन गुरव व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रामदास लोकरे यांना वैयक्तिक बक्षिसे देऊन सन्मानित केले.
स्पर्धेचे उद्घाटन अनिल पाटील, राहुल घाटगे, किरण पाटील, दगडू हरेल, संदीप पाटील यांच्या हस्ते पार पडले, तर बक्षीस वितरण पांडुरंग सावंत, गोकुळ दूध संघाचे सुपरवायझर राहुल घाटगे, प्रकाश देसाई, अंकुश वारके यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धा संयोजनासाठी अनिल पाटील, बाजीराव कुरळे, किरण पाटील, राहुल घाटगे, प्रकाश देसाई, सागर पाटील, इम्रान नाईकवडी, विकी बुरटे, श्रीधर कोंडेकर, प्रताप माने, विजय सावंत, ओंकार पाटील, सूरजित पाटील, फिरोज नाईकवडी, बाबूराव पाटील, विशाल पाटील यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ
यमगे (ता. कागल) येथील प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत विजेत्या घाटगे सुपर किंग्ज संघास पारितोषिक देताना पांडुरंग सावंत, राहुल घाटगे, अनिल मारुती पाटील, अंकुश वारके, आदी उपस्थित होेते.