शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिकांना संपविण्याचा घाट

By admin | Updated: January 30, 2015 23:15 IST

अशोक ढवळे यांची टीका : ‘भाकप’चे दोन दिवसीय अधिवेशन सुरू

कोल्हापूर : ज्या गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले, त्यांच्याच मारेकऱ्यांच्या हातात देशाची आणि राज्याची सत्ता आहे. भांडवलदारांना हाताशी धरून कष्टकरी, शेतकरी आणि कामगार यांच्या हक्कांवर गदा आणण्याचे षड्यंत्र मोदी सरकारने रचले आहे. धर्मांध वृत्ती धर्मपरिषदांमधून धर्मनिरपेक्षतेलाच आव्हान देत आहेत. अशा परिस्थितीमध्ये देशाची एकात्मता आणि श्रमिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी डाव्या पक्षांनी एकजुटीने लढण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारताचा कम्युनिस्ट पक्षाचे े(मार्क्सवादी) राज्य सचिव अशोक ढवळे यांनी केले. भारताचा कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने (मार्क्सवादी) कोल्हापूर येथील आठव्या दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन आज, शुक्रवारी ढवळे यांच्या हस्ते झाले. यानंतर ते बोलत होते. नथुराम गोडसेसारख्या वृत्तींचे उदात्तीकरण करून देशाचा इतिहासच बदलण्याचे कारस्थान सुरू आहे. हे रोखून देशात धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता सामाजिक न्याय आणि श्रमाला न्याय देण्यासाठी वैचारिक व राजकीयदृष्ट्या प्रगल्भ, पुरोगामी कार्यकर्त्यांची फळी उभारणे गरजेचे आहे, असे ढवळे यांनी सांगितले.माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, राजकारण तत्त्वहीन बनत चालले आहे. श्रमाची प्रतिष्ठा कमी होत असून, भगवे कापड परिधान केलेल्यांचे महत्त्व वाढत चालले आहे. हे वास्तव समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी लाल बावट्याच्या लढाईत तरुणांनाही सामील करून घेतले पाहिजे. यावेळी ‘माकप’चे राज्य सचिव मंडळ सदस्य महेंद्र सिंग, राज्य कमिटी सदस्य एम. एच. शेख यांची भाषणे झाली. चंद्रकांत यादव यांनी प्रास्ताविक, जिल्हा सचिव सुभाष जाधव यांनी अहवाल वाचन, उदय नारकर यांनी सूत्रसंचालन, तर शिवाजी मगदूम यांनी आभार मानले.कहाँ गये अच्छे दिन...‘अच्छे दिन’चा संदर्भ देत ढवळे म्हणाले, ‘एका महिन्यात महागाई कमी करण्याचे तसेच बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते. आजही महागाई कमी झालेली नाही. रोजगार हमी योजना गुंडाळण्याच्या दृष्टीने मोदींची हालचाल सुरू आहे. कामगार कायदे रद्द करण्याचा घाट मोदी यांनी घातलेला आहे. विमा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढल्यामुळे देशातील विमा कंपन्यांमध्ये बेकारी वाढणार आहे.