शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात ‘घरकुल’ सर्व्हे पालिकेचा पुढाकार : ‘प्रधानमंत्री आवास’साठी नागरिकांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:00 IST

केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत सर्वांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर शहरातील घरांच्या मागणीबाबत पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. चार घटकांतर्गत या घरकुलांचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे.

संदीप बावचे।जयसिंगपूर : केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत सर्वांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर शहरातील घरांच्या मागणीबाबत पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. चार घटकांतर्गत या घरकुलांचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे. गेल्या वर्षभरापासून ही योजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, योजनेतील अटींमुळे लाभार्थी मिळणे प्रशासनासमोर अवघड बनले. पालिका सभेत नगरसेवकांकडून या योजनेबाबत विचारणा झाल्यानंतर पुन्हा एकदा पालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलासाठी नागरिकांना आवाहन केले आहे.

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल वाटपाची जुनी योजना बंद करत केंद्र सरकारने सन २०१२ च्या सामाजिक, आर्थिक आणि जातीनिहाय सर्वेक्षणाच्या आधारे प्रधानमंत्री आवास योजना सन २०१६ पासून सुरू केली आहे. त्यानंतर सर्वेक्षणाआधारे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनाही ही योजना लागू आहे. जयसिंगपूर शहरातही प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याबाबत ठराव झाला होता. मात्र, योजनेला शहरातून अल्पसा प्रतिसाद मिळाला. नुकत्याच झालेल्या पालिका सभेत या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नगरसेविका अ‍ॅड. सोनाली मगदूम यांनी केला होता. नगरसेवक अस्लम फरास यांनी आपण तीन जणांचे घरकुल योजनेसाठी बँकेत अर्ज दिले आहेत. मात्र, बँक पैसे द्यायला तयार नाही, असे स्पष्ट केले होते. योजनेवरून सभेत ऊहापोह झाल्यानंतर पालिका प्रशासनाने याबाबत पुढाकार घेतला आहेयोजनेतील घटककेंद्र शासनाने सर्वांना २०२२ पर्यंत पक्की घरे उपलब्ध करुन देण्याबाबत धोरण ठेवले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जयसिंगपूर शहरात त्याची अंमलबजावणी करण्याकरिता शहरात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये चार घटकांचा समावेश असून ज्याठिकाणी झोपडपट्ट्या आहेत त्याठिकाणी घरांची निर्मिती करणे, लाभार्थ्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार घरे उभारणे, भागीदारी तत्त्वावर घरांची निर्मिती करणे, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वत:च्या जागेवर नवीन घरकुल अथवा राहत्या घराचे वाढीव बांधकामासाठी अनुदान, अशा घटकांचा या योजनेत समावेश केला आहे.उत्पन्न मर्यादा प्रधानमंत्री आवास योजनेसाठीअत्यल्प ३ लाख, तर अल्प ६ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्नाची अट आहे. भारतात कुठेही स्वमालकीचे घर नसावे. जयसिंगपूर पालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांनाच या योजनेत सहभाग घेता येईल. एकूणच पालिकेने घरकुल योजनेसाठी पुढाकार घेतला आहे..प्रस्तावाचे आवाहनप्रधानमंत्री आवास योजनेसाठी जयसिंगपूर शहरातील मागणी विचारात घेऊन या योजनेचा कृती आराखडा तयार करुन तो शासनाला सादर केला जाणार आहे. घरांची मागणी व प्रस्ताव सादर करण्यासाठी नगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे. लाभार्थ्यांना घरे मागणीसाठी आॅनलाईन अर्ज उपलब्ध करण्यात आली आहेत शिवाय पालिकेतदेखील अर्ज उपलब्ध आहेत.