शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकत्र येण्यासाठी मंदिर हे केंद्र बनवा:चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:25 IST

कोल्हापूर : विधायक कार्य, समाजाच्या भल्यासाठी एकत्र या. एकत्र येण्यासाठी मंदिर हे केंद्र बनवा. आपल्या कॉलनीत मंदिर असल्यास ते ...

कोल्हापूर : विधायक कार्य, समाजाच्या भल्यासाठी एकत्र या. एकत्र येण्यासाठी मंदिर हे केंद्र बनवा. आपल्या कॉलनीत मंदिर असल्यास ते अधिक चांगले करा. नसल्यास लोकभावना लक्षात घेऊन मंदिर उभा करा. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत मी करेन, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे केले.येथील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या माध्यमातून आयोजित ‘नवऊर्जा महोत्सवा’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. निर्माण चौकात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाचा रविवारी रात्री श्री दत्तगुरूंच्या ३३ फुटी मूर्तीसमोर आरती करून समारोप झाला. यावेळी अंजली पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर प्रमुख उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरचे पर्यटन वाढविण्याच्या उद्देशाने हा महोत्सव घेण्यात आला. त्याला सुमारे आठ लाख जणांनी भेट दिली. त्यातील साधारणत: चार लाख बाहेरील पर्यटक होते. परमेश्वर मानणाऱ्यांसाठी एक माध्यम म्हणून हा उत्सव कामी आला. पोटाची भूक पूर्ण झाल्यानंतर मनाची भूक भागविण्यासाठी असे महोत्सव, कार्यक्रम शासन आणि विविध संस्थांनी घ्यावेत. समाजाच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. त्यातून एक सकारात्मक दबाव निर्माण होतो. एकत्र येण्यासाठी मंदिर हे केंद्र बनवा.या कार्यक्रमात राहुल चिकोडे यांनी महोत्सवाचा आढावा घेतला. चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, महोत्सवात दुपारी राजेंद्र मेस्त्री आणि सहकाºयांनी ‘नाद सुरमयी’ हा कार्यक्रम सादर केला. राम सारंग, रवींद्र जोशी, मेधप्रणव पोवार, करण चव्हाण, विक्रम पाटील, महेश बगाडे, शिवतेज पाटील, तृप्ती पाटील, श्रीराज भोसले, आदित्य सवळकर, पूर्वा कोडोलीकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर, सचिन शानबाग, देवल क्लबचे कार्यवाह सचिन पुरोहित, अ‍ॅड. धनंजय पठाडे यांचा सत्कार करण्यात आला. ‘मामाच्या गावाला जाऊया’ निबंध स्पर्धेतील विजेते वैष्णवी कबेळकर, आर्य नलवडे, तेजस्विनी माळी, श्रावण पोवार, चेतन पाटील, वरद घोडके यांना बक्षिसे देण्यात आली. सार्थक क्रिएशनच्या कलाकारांनी नवऊर्जा गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला. संग्राम पाटील यांनी मराठी सिनेगीते सादर केली. या महोत्सवाला नागरिक, पर्यटकांचा उदंड प्रतिसाद लाभला.