शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

एकचा क्वॉईन टाका, ई टॉयलेटमध्ये जावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:30 IST

शेखर धोंगडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रस्त्यावर कोणीही उघड्यावर शौचास बसू नये, तसेच होणाºया दुर्गंधी व प्रदूषणामुळे सर्वांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठीच स्वच्छ भारत अभियानअंतर्गत आता ‘एक रुपयाचे क्वाईन टाका व अत्याधुनिक अशा ई टॉयलेट’ सुविधेचा वापर करा, असे आवाहन शासनपातळीवरून होत आहे. त्यास प्राथमिक स्तरावर शहरी भागातून सकारात्मक प्रतिसाद ...

शेखर धोंगडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रस्त्यावर कोणीही उघड्यावर शौचास बसू नये, तसेच होणाºया दुर्गंधी व प्रदूषणामुळे सर्वांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठीच स्वच्छ भारत अभियानअंतर्गत आता ‘एक रुपयाचे क्वाईन टाका व अत्याधुनिक अशा ई टॉयलेट’ सुविधेचा वापर करा, असे आवाहन शासनपातळीवरून होत आहे. त्यास प्राथमिक स्तरावर शहरी भागातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, याची मागणीही वाढत असल्याचे दिसून येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ई टॉयलेट ही संकल्पना देशातील प्रत्येक गावा-गावांत राबविण्यात येत आहे. येत्या चार वर्षांत सिमला ते कन्याकुमारी व गुजरात ते आसामपर्यंत ई टॉयलेट सुविधा देण्यात येणार आहे.भारतात तमिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेशसह महाराष्ट्रात नवी मुंबई, महाबळेश्वर, पाचगणी, सोलापूर येथे ई टॉयलेट येथे ही सुविधा आहे.कोल्हापूर येथे रुईकर कॉलनी, मेरी वेदर ग्राऊंड, बिंदू चौकानजीक, ताराबाई गार्डन अशा चार ठिकाणी ही सुविधा सुरू झाली आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार आणखी काही ठिकाणी ई टॉयलेट सुविधा सुरू केली जाणार आहे.सातारा, सासवड, अकोला, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, कल्याण-डोेंबिवली तसेच पुणे येथे स्मार्ट सिटीअंतर्गत येत्या काही महिन्यांत ही सुविधा सुरू होईल, असे ईराम सांयटिफिक सोल्यूशन कंपनीतर्फे सांगण्यात आले. पहिले सहा महिने ते एक वर्ष कंपनीकडून दुरुस्ती व स्वच्छतेची सेवा मोफत पुरविली जाईल. त्यानंतर मात्र ठराविक रक्कम घेऊन स्वच्छता व दुरुस्तीची जबाबदारी कंपनीकडेच राहील.ई टॉयलेट वापरण्याचीपद्धत व सुविधासंपूर्ण स्टेनलेस स्टील बॉडी व अत्याधुनिक व जीपीएस यंत्रणा बसवलेले हे ई टॉयलेट १ रुपयाचे कॉईन टाकल्यानंतर दरवाजा उघडला जातो. आत गेल्यानंतर पाण्याची योग्य सुविधा, स्वच्छतेची पूरेपुर काळजी घेण्याबरोबरच युपीएस, लाईट, आवश्यक तितके पाणी व बचत यांचा मेळ घालण्यात आला आहे. येथे लोकेशन, तक्रारीही नोंदविता येणार आहे. महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन व्हेडिंग मशीनचीही सुविधा दिली आहे.वैशिष्ट्येइलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर व सेन्सर, एलईडी अशा विविध सुविधा ई-टॉयलेटमध्ये उपलब्ध आहेत.युपीएस बॅटरीची सुविधाचार तासांत संपूर्ण स्वच्छतादररोज ५० ते ७० लोकांना वापरण्यास योग्यपाण्याच्या बचतीचाही यात विचार केला आहे.