शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

संघटित व्हा, अन्यायाविरोधात लढा द्या

By admin | Updated: January 29, 2015 00:16 IST

‘छेडछाड का ?’ : तरुणींवरील अत्याचाराविरोधात महिला फेडरेशनतर्फे जनजागृती

कोल्हापूर : महिला, युवतींवरील अत्याचार दिवसें-दिवस वाढत आहेत. ते थांबविण्यासाठी अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी समाजातील प्रत्येकाने पहिल्यांदा माणूस बनावे, संघटित व्हावे आणि अन्यायाविरोधात लढा द्यावा, असा संदेश आज, बुधवारी नाटकातून तरुण-तरुणींना दिला.भारतीय महिला फेडरेशनतर्फे ‘छेडछाड का? ’ या नाटकाचा प्रयोग शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रात झाला. दीक्षान्त समारंभाच्या पार्श्वभूमीवर हे नाटक आयोजित केले होते. नाटकाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, पी. व्ही. बिलावर आदी उपस्थित होते. समाजात सध्या छेडछाडीचे प्रकरणांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, त्याकडे समाज गांभीर्याने पाहत नसल्याचे वास्तव आहे. तरुणींची छेडछाड आणि हिंसा या गंभीर घटना आहेत. त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी व अशा प्रवृत्तींविरोधात सध्या समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला नाही घाबरत, तुम्ही निर्भयपणे पोलिसांत तक्रार द्या, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांना वठणीवर आणले पाहिजे तरच,अत्याचारीत मुलीला न्याय मिळेल असा संदेश देत तरुण-तरुणींनी ‘मी गप्प बसणार नाही व छेडछाडीला विरोध करेन,अशी शपथ नाटकाच्या माध्यमातून घेतली. नाटकात दीपा सुतार, मानसी पळशीकर, सागर खुर्द, प्रसाद महेकर, प्रशांत सुतार, विठ्ठल माधव, विजय कुरणे, श्रद्धा गायकवाड, प्रियांका राऊत यांनी उत्कृष्टपणे सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. दरम्यान, नाटक संपल्यानंतर कुलगुरू डॉ. पवार यांच्या हस्ते फेडरेशनच्या जिल्हा अध्यक्षा डॉ. मेघा पानसरे यांचा सत्कार करण्यात आला. नाटक पाहण्यासाठी उपस्थित असलेल्यांपैकी काहींनी कलाकारांची भेट घेऊन आपल्याला तसेच त्यांच्याशी संबंधित तरुणी, महिलांना आलेले अनुभव सांगितले. (प्रतिनिधी)जागृतीचे प्रभावी माध्यम...महिला, तरुणींवरील अन्यायाविरोधात समाजात जागृती करण्यासाठीचे ‘छेडछाड का ?’ हे नाटक प्रभावी ठरणारे माध्यम असल्याचे कुलगुरू डॉ. पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, सध्या समाजातील गंभीर विषय या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. तरुण-तरुणींनी उत्तमपणे अभिनयाचे सादरीकरण केले.