शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

‘भू-विकास’प्रश्नी अर्थखात्याकडून दखल

By admin | Updated: December 3, 2015 00:48 IST

सहकार विभागाला पत्र : तातडीने बैठक घेण्याची विनंती

सांगली : राज्यातील भू-विकास बँकांच्या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी न देताच कार्यमुक्त करण्याच्या धोरणाबाबत कर्मचारी संघटनेने केलेल्या तक्रारीची दखल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. सहकार विभागाने यासंदर्भात तातडीने बैठक घ्यावी, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांच्या भूमिकेमुळे भू-विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांना किमान दिलासा मिळाला आहे. कर्ज वसुलीसाठी आवश्यक तेवढे कर्मचारी ठेवून इतरांना स्वेच्छानिवृत्ती देण्याचे धोरण राज्य शासनाने परिपत्रकातून स्पष्ट केले होते. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची उपदान (ग्रॅच्युईटी) व इतर वैधानिक देणी कर्ज वसुलीतून अदा करण्यात येणार होती. कर्ज वसुलीला प्रतिसाद न मिळाल्यास मालमत्तांच्या लिलावातून ही देणी भागविण्याचे धोरण होते. प्रत्यक्षात सहकार विभागाकडून कोणतीही देणी न देताच कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृती देण्याचे धोरण स्वीकारले जात आहे. देणी न देता कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृती देण्याचे प्रकार राज्यातील काही जिल्ह्यात घडल्याची तक्रार राज्य भू-विकास बँक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील यांनी सोमवारी शासनाकडे केली. भू-विकास बँकांच्या प्रश्नावर नियुक्त त्रिसदस्यीय समितीच्या अध्यक्ष व सदस्यांना त्यांनी तक्रारीचे निवेदन पाठविले होते. समितीचे अध्यक्ष अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी या तक्रारीची दखल घेत, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून, याबाबत तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली आहे. तक्रारीत एम. पी. पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील कर्मचाऱ्यांनी इतका संघर्ष करूनही भू-विकास बॅँकांचे पुनरुज्जीवन राज्य शासनाने केले नाही. बॅँकांचे पुनरुज्जीवन सहज शक्य होते. तरीही बँका अवसायनात काढण्याचा दुर्दैवी निर्णय झाला. तरीही मंत्रीगट समितीने कर्मचाऱ्यांना त्यांचा मोबदला देण्याचा, काहींना अन्य शासकीय विभागात सामावून घेण्याचा निर्णय झाला. वास्तविक कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करताना त्यांची देणी प्रथम देणे आवश्यक होते. प्रत्यक्षात समितीने घेतलेल्या निर्णयाविरोधात धोरणे राबविली जात आहेत. या गोष्टी तात्काळ थांबवून राज्यातील भू-विकास बँक कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. शासननिर्णय आणि शिखर बँकेच्या कार्यपद्धतीप्रमाणे कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृती लागू करावी. आर्थिक अडचणी येत असतील तर मालमत्तांचे लिलाव करून कर्मचाऱ्यांची देणी द्यावीत, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी) ‘सहकार’च्या धोरणांबाबत नाराजी कायम राज्य शासनाने या प्रश्नाची दखल घेतल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनेने तूर्त आंदोलनाचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, कर्मचाऱ्यांमधून सहकार विभागाच्या धोरणांबाबत नाराजी कायम आहे.