शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

वेगळा विचार करायला लावणारे ‘जीनियस’

By admin | Updated: October 18, 2015 23:47 IST

अच्युत गोडबोले : विद्यार्थी, पालकांशी साधला संवाद

कोल्हापूर : पालक आपली स्वप्ने मुलांवर लादत आहेत. त्यातून पगाराचे मोठे पॅकेज, फ्लॅट आणि चारचाकी मिळविली म्हणजे आयुष्याचे सार्थक झाले, असा समज असलेली संस्कृती सध्या रुजत आहे. अशा स्थितीत ‘जग बदलणारे जीनियस’ हे तरुणाईसह पालकांना वेगळा विचार करायला लावतील, असे प्रतिपादन लेखक अच्युत गोडबोले यांनी रविवारी येथे केले.येथे राजर्षी शाहू स्मारक भवनात ‘जग बदलणारे १२ जीनियस’ या पुस्तकावरील व्याख्यानात ते बोलत होते. ग्रंथ कॉर्नर, जिल्हा मुख्याध्यापक संघ, मनोविकास प्रकाशनतर्फे आयोजित कार्यक्रमास सहलेखिका दीपा देशमुख उपस्थित होत्या.गोडबोले म्हणाले, विविध स्वरूपांतील जाहिराती पाहून पालक आपली स्वप्ने मुलांवर लादत आहेत. पालक अशी स्वप्ने साकारण्यासाठी अनेकदा मुलांची आवड लक्षात घेत नाहीत. पगाराचे मोठे पॅकेज, फ्लॅट आणि चारचाकी मिळविली म्हणजे आयुष्याचे सार्थक झाले, असा समज असलेली संस्कृती सध्या रुजत आहे. या संस्कृतीच्या पलीकडे जाऊन तरुणाई, पालकांना ‘जग बदलणारे जीनियस’ हे वेगळा विचार करायला आणि नवी स्वप्ने पाहायला लावतील. मुला-मुलींनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करावे. त्यातून निश्चितपणे कामाचे समाधान तर मिळेलच; शिवाय संबंधित क्षेत्राच्या विकासाला गती मिळेल.देशमुख म्हणाल्या, सध्याच्या तरुणाईला उपदेशात्मक लेखन आवडत नाही. ते लक्षात घेऊन ‘जग बदलणारे १२ जीनियस’चे लेखन केले आहे. तरुणाईला हवे ते देण्याचा प्रयत्न केला आहे. हे ‘जीनियस’ वाचकांना आपले मित्र-नातलग असल्यासारखे वाटतील, असे लेखन केले आहे.शिवाजी विद्यापीठाच्या वाचन कट्ट्याचे समीर अनपट, न्यू कॉलेजचे प्रा. टी. के. सरगर यांचा गोडबोले यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के. बी. पवार, सचिव आर. वाय. पाटील, आदी उपस्थित होते. ‘ग्रंथ कॉर्नर’चे संचालक सुभाष पाटील यांनी स्वागत केले. सीमा मकोटे यांनी सूत्रसंचालन केले. विचारवंत, संशोधक व्हावेत‘जग बदलणारे १२ जीनियस’ हे प्रथम प्रकाशित होईल. त्यात गॅलिलिओ गॅलिली, आयझॅक न्यूटन, अल्बर्ट आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग, एडवर्ड जेन्नर, रॉबर्ट कॉख, लुई पाश्चर, अ‍ॅलेक्झांडर फ्लेमिंग, मेरी क्युरी, लीझ माइट्नर, जे. रॉबर्ट ओपेनहायमर, रिचर्ड फाईनमन यांच्या जीवनपटाचा समावेश आहे. ७२ ‘जीनियस’मध्ये विज्ञानातील २४, तंत्रज्ञानातील १२ व अर्थशास्त्र, मानसशास्त्र, क्रांतिकारक व तत्त्वज्ञ अशा ३६ जण असतील. प्रत्येकाचे काम ५० ते ६० पानांमध्ये मांडला जाईल. त्यातून तरुणाईला निश्चितपणे नवीन काही तरी मिळेल. सहा ते आठ महिन्यांला १२ ‘जीनियस’ची मालिका प्रकाशित होईल.