शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

‘जीडीपी’वाढीसाठी प्रक्रिया उद्योगाला ‘बळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:44 IST

गणेश शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशाचा जीडीपी उत्पादन प्रक्रिया आणि विक्री यांवर अवलंबून असून, उत्पादन क्षेत्रात ...

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशाचा जीडीपी उत्पादन प्रक्रिया आणि विक्री यांवर अवलंबून असून, उत्पादन क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांना बळकटी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, त्या दृष्टीने रॅँडम पद्धतीने विविध उद्योगांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणातील माहितीनुसार उद्योगांसाठी आराखडा तयार केला जाणार आहे.कोणत्याही देशाची प्रगती ही आर्थिक विकासदरावर अवलंबून असते. सध्या जगाचा आर्थिक विकास दर ३.५ टक्के, तर देशाचा ७.३ टक्के आहे. दरवर्षी विकासदर वाढतच असतो; पण त्याच्यात किती सक्षमतेने वाढ होते, हे महत्त्वाचे असते. आपला विकास दर ज्या गतीने वाढायला हवा, तो वाढत नाही, ही केंद्र सरकारच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. उत्पादकता, प्रक्रिया आणि विक्री यांवर विकासदर अवलंबून असतो. शेतीतून अपेक्षित उत्पादकता मिळत नाही. नैसर्गिक संकटे आणि बदलणाऱ्या हवामानाच्या फटक्यामुळे शेतीची उत्पादकता कमी झाली आहे. त्याचा परिणाम विकास दरावर दिसत आहे. शेती उत्पादनाबरोबरच आता प्रक्रिया उद्योगावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. प्रक्रिया उद्योगांना बळकटी देण्याचे धोरण सरकारच्या विचाराधीन असून, त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू केले आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालयांतर्गत कोल्हापूर जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने गेल्या तीन वर्षांतील उद्योगांची पाहणी केली जाणार आहे. यामध्ये संबंधित उद्योगांची सगळी माहिती संकलित केली जाणार आहे. उत्पादन कधी सुरू झाले इथपासून नफा-तोटा पत्रकापर्यंत माहिती घेऊन त्यानुसार उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. ही माहिती घेऊन उद्योगाच्या बळकटीसाठी उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.ही माहिती घेणारकारखान्याचा पत्ता, किती वर्षांपूर्वी सुरुवात, उत्पादनाची सद्य:स्थिती, स्थावर मालमत्ता, मनुष्यबळ, भाग भांडवल, कर्जे, कामगार पगार व बोनस, भविष्यनिर्वाह निधी, इतर जोखीम, कच्चा माल, विजेचा वापर, प्रत्यक्ष उत्पादन, उत्पादन खर्च, विक्री व्यवस्था, इतर उत्पादने व सध्याचा स्टॉक.