शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सुनील शिंदे यांचा नाट्य परिषदेकडून गौरव

By admin | Updated: November 17, 2015 00:25 IST

सलग पाच वर्षे राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांच्या नाटकांनी पारितोषिके पटकावली

कोल्हापूर : अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे दरवर्षी रंगभूमीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मींना पुरस्काराने गौरविण्यात येते. बालरंगभूमीकरिता योगदान दिलेले कोल्हापूरच्या शिंदे अकॅडमीचे संस्थापक व दिग्दर्शक सुनील शिंदे यांना यावर्षी हा पुरस्कार जाहीर झाला होता. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या हस्ते शिंदे यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.संबंधित पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ८ नोव्हेंबरला गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनी माटुंगा (मुंबई) येथील यशवंत नाट्य संकुलात झाला. यावेळी मावळत्या नाट्य संमेलनाध्यक्षा फैयाज, नूतन संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर, दीपक करंजीकर, विजय कदम, मंगेश कदम, प्रफुल्ल महाजन, आदी उपस्थित होते. दरम्यान, दिग्दर्शक सुनील शिंदे हे १९८३ पासून रंगभूमीवर कार्यरत आहेत. पंडित सत्यदेव दुबे, दामू केंकरे, माधव वाटवे, प्रकाश बुद्धिसागर यांच्या कार्यशाळेतून त्यांनी प्रशिक्षण घेतले. रंगभूमीवरील अनेक नाटकांत अभिनय, तंत्रज्ञ, दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे. चाळीसहून अधिक पारितोषिक प्राप्त एकांकिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. सन २००१ मध्ये त्यांनी शिंदे अकॅडमीची स्थापना केली. त्याद्वारे ते रंगभूमीवर कार्यरत झाले. गेल्या १५ वर्षांत त्यांनी ३३ बालनाट्यांची निर्मिती केली आहे. सलग पाच वर्षे राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांच्या नाटकांनी पारितोषिके पटकावली आहेत. प्राथमिक फेरीत सांघिक व दिग्दर्शन प्रथम क्रमांकाची त्यांनी हॅट्ट्रिक केली आहे. प्राथमिक व अंतिम फेरीत दिग्दर्शनाची सलग दहा आणि प्रकाशयोजनाची पाच पारितोषिके त्यांनी पटकावली आहेत. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांना नाट्य परिषदेने पुरस्काराने सन्मानित केले आहे. (प्रतिनिधी)