फोटो क्रमांक -१२०९२०२१-कोल-गौराई०१
ओळ - सेल्फी वुईथ गौराई : कोल्हापूर शहरात रविवारी गौराईचे आगमन झाले. पंचगंगा नदीघाटावर विधिवत पूजन झाल्यानंतर गौराईला घरी नेले जाते. हा आनंदाचा क्षण आपल्या मोबाइलमध्ये टिपण्याचा मोह या गौराईंना आवरला नाही. (छाया : नसीर अत्तार)
फोटो क्रमांक -१२०९२०२१-कोल-गौराई०२
ओळ - नटलेल्या, सजलेल्या, दागिण्यांनी मढलेल्या या गौराईंनी डोईवर कलश, कलशात गौराई घेऊन घरी नेऊन पूजन केले. छाया : नसीर अत्तार
फोटो क्रमांक -१२०९२०२१-कोल-गौराई०३/०४/०५
ओळ - फुगडी : गौरी-गणपतीचा सण म्हणजे महिलांच्या दृष्टीने सजण्याचा, खेळण्याचा सण. गौराईच्या आगमनाप्रीत्यर्थ पंचगंगा घाटावर सुवासिनींनी फुगडीचे असे फेर धरले. (छाया : नसीर अत्तार)
फोटो क्रमांक -१२०९२०२१-कोल-गौराई०६
ओळ - कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर पूजा झाल्यानंतर गौराईला घेऊन जाताना सुवासिनींचा उत्साह टिपेला पोहोचला होता. (छाया : नसीर अत्तार)