शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

राधानगरी धरणाचा एक दरवाजा पुन्हा उघडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:23 IST

कोल्हापूर : पावसाचा जोर ओसरल्याने गुरुवारी बंद झालेला राधानगरीचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा पाऊस वाढल्याने शनिवारी दुपारी सव्वातीन वाजता ...

कोल्हापूर : पावसाचा जोर ओसरल्याने गुरुवारी बंद झालेला राधानगरीचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा पाऊस वाढल्याने शनिवारी दुपारी सव्वातीन वाजता पुन्हा उघडला. धरणातून २८२८ क्युसेक विसर्ग भोगावती पात्रात सुरू झाल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे. दरम्यान शनिवारी सकाळपासून पावसाची उघडझाप सुरू राहिली. दुपारनंतर मात्र चांगलाच जोर धरला. त्यामुळे खुले होत असलेले बंधारे पुन्हा पाण्याखाली गेले. आता पाण्याखालील बंधाऱ्यांची संख्या ३४ वर गेली आहे.

दरम्यान पाणलोट क्षेत्रातही चांगलाच पाऊस कोसळत आहे. पाटगाव जलाशयात १०५ मिलिमीटर इतकी अतिवृष्टी झाली आहे. इतर सर्वच जलाशयात साधारपणे ३० ते ७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातील पाऊस आणि उर्वरित जिल्ह्यात अधून मधून कोसळणाऱ्या जोरदार सरीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारपर्यंत केवळ ३३ बंधारेच पाण्याखाली राहिले होते, शुक्रवारी खुला झालेला दूधगंगा नदीवरील सुळंबी बंधारा पुन्हा पाण्याखाली गेला.

दूधगंगा धरण ८४ टक्के भरले असले तरी त्यातून ६२०० क्युसेक प्रतिसेकंद विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू असल्याने नदीची पाणीपातळी पुन्हा वाढू लागली आहे. नदीवरील पाण्याखाली जाणाऱ्या बंधाऱ्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे. वारणेतूनही १४ हजार क्युसेक विसर्ग सुरू असल्याने नदीवरील ९ बंधारे पूर्णपणे पाण्याखाली आहे. दरम्यान पंचगंगा नदीला आलेला महापूर ओसरू लागला होता. शुक्रवारी ३७ फुटांपर्यंत पाणीपातळी कमी आली होती. शनिवारी दुपारपर्यंत त्यात आणखी फुटाने घट होऊन ती ३६ फुटांवर आली होती. नदी हळूहळू पात्राच्या आत सरकत असताना पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणातून विसर्ग १४०० क्युसेकने वाढल्याने पाणी पुन्हा चढू लागले आहे.

पाण्याखालील बंधारे

पंचगंगा : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ

भोगावती : हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे

तुळशी : आरे, बीड

वारणा : चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगाव, तांदूळवाडी, चावरे, खोची, दानोळी, मांगले सावर्डे

कासारी : यवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे आळवे

वेदगंगा : कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली

दूधगंगा : दत्तवाड, बाचणी, सुळकूड, सिद्धनेर्ली, सुळंबी

धरणातील विसर्ग (क्युसेकमध्ये)

राधानगरी २८००

तुळशी १५२१

वारणा १४३६९

दूधगंगा ६२००

कासारी १२५०

कडवी ८६५

कुंभी १०००

पाटगाव २५०

चिकोत्रा ५६०

चित्री ५२१

जंगमहट्टी १९९

घटप्रभा ४११५

जांबरेे २७३

आंबेओहोळ ९७

कोदे १००

चौकट

नदीकाठच्या पिकांचा चिखल

नद्या अजूनही पात्राबाहेरूनच वाहत असल्याने नदीकाठची उसासारखी पिके पाण्याखालीच आहेत. पूर आल्याला आठ दिवस होऊन गेले तरी पाणी वेगाने ओसरत नसल्याने नदीकाठच्या पिकांचा अक्षरश: चिखल झाला आहे. थोडीशी उघडीप मिळाली तर पाण्याखाली असलेल्या ऊस पिकाला काही प्रमाणात जीवदान मिळू शकते; पण पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

चौकट

पंचनाम्यातही अडसर

पाऊस थांबल्याने कृषी विभागाने पीक नुकसानीचे पंचनामे सुरू केले होते; पण पावसाने हजेरी कायम ठेवल्याने या कामात अडथळे येत आहेत. आधीच शिवारे बऱ्यापैकी पाण्याने तुंबलेली असल्यामुळे शेतात जाणेच अवघड आहे, जरा ऊन पडल्याने जाता येईल तसा शेतात पाय ठेवला जात आहे.