शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कारदग्यातील ग्रामीण साहित्य संमेलन २९ ला

By admin | Updated: November 17, 2015 00:45 IST

रामीण लेखक व कवींनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांच्या हस्ते

हुपरी : कारदगा (ता. चिक्कोडी) येथील साहित्य विकास मंडळाच्यावतीने गेल्या २० वर्षांपासून भरविण्यात येणारे २० वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन २९ नोव्हेंबरला होणार आहे. पिंपरी-चिंचवड येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नाडगे व उपाध्यक्ष भगवंत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाबाबत माहिती देताना ते म्हणाले, २९ नोव्हेंबरला (रविवारी) सकाळी ८ ते रात्री ११ या वेळेत सहा सत्रांमध्ये संमेलन होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्य कोकण विभागाचे आयुक्त तानाजी सगे यांच्या हस्ते व अखिल भारतीय साखर संघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. भीमराव गस्ती व राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनंदा बहेनजी यांची विशेष निमंत्रित म्हणून उपस्थिती असणार आहे. सरस्वती प्रतिमा पूजन बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ग्रामीण लेखक व कवींनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार असून संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा गोधाबाई गावडे आहेत. यावेळी ग्रामीण लेखक आप्पासाहेब पवार (लोकूर) यांच्या ‘पाऊलवाटा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे ‘शाश्वत ग्रामीण विकास’ या विषयावर मुक्त चिंतन होणार आहे. तिसऱ्या सत्रामध्ये ‘नवी आशा, नवा उन्मेष, नवा आविष्कार’, मातीत मातीशी बोेलू काही... या सदरात नामवंत व उदयोन्मुख कवींचा सहभाग असणाऱ्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.चौथ्या सत्रात महाराष्ट्र राज्य संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समितीचे माजी अध्यक्ष माधवराव पाटील यांच्या ‘निराळं जग’ या सदरात ‘सुखी संसाराचे रहस्य’ या विषयावर समाज प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे.