शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

‘राजाराम’च्या गाडीअड्डा जागेवर बगीचा

By admin | Updated: February 4, 2015 23:58 IST

महापालिकेचा घाट : सोमवारच्या सभेत ठराव येणार; कारखान्याची न्यायालयात धाव

संतोष पाटील -कोल्हापूर -कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या गाडीअड्ड्याच्या मध्येच बगीचा करण्याचा घाट घातला जात आहे. महापालिकेच्या सोमवारी (दि. ९) होणाऱ्या महासभेत ‘राजाराम’च्या, पर्यायाने १५ हजार सभासदांच्या मालकीच्या जागेवर बगीचा करावा, असा ठराव आडमार्गाने आणला आहे. नेत्यांना खूष करण्यासाठीच हा ठराव घुसडल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. दरम्यान, याविरोधात राजाराम कारखान्याने न्यायालयात धाव घेतली आहे.कसबा बावडा येथे १९३२ साली स्थापन झालेला राजाराम कारखाना वाढत्या शहरीकरणात शहरातीलच एक भाग बनून गेला. अत्यंत कमी जागेत असलेल्या या कारखान्याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. कसबा बावड्यातील मध्यवस्तीपासूनच रस्त्यावर थांबलेल्या उसाच्या वाहनांचा तब्बल सहा महिने वाहतुकीस अडथळा होत असतो. बावडा परिसरातील ८० टक्के कुटुंबे शेतीवर आधारित असल्याने हा त्रासही नागरिक सहन करतात. कारखान्याला ‘को-जनरेशन प्लॅँट’च्या उभारणीसाठी जागा नसल्याने प्रकल्पच गेली सात वर्षे खोळंबला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी ‘राजाराम’च्या व्यवस्थापनाने कारखान्याजवळीलच खासगी जागा विकत घेऊन ती उसाच्या बैलगाड्या थांबण्यासाठी ‘गाडीअड्डा’ म्हणून विकसित केली.राजाराम कारखान्याच्या जागेवर बगीचासाठी आरक्षण टाकण्याचा ठराव महापालिका महासभेपुढे येत आहे. यापूर्वी असा प्रकार घडल्याने कारखान्याने न्यायालयात दाद मागितली आहे. प्रत्यक्षात नगरसेवकांनी आणलेला हा ठराव महापालिका प्रशासनाने, पर्यायाने नगरविकास विभागाने ठेवल्याचे चित्र भासविण्यात येत आहे. आमदार महाडिक यांना मानणारा नगरसेवकांचा मोठा वर्ग आहे. त्यामुळे सभेपुढे हा विषय येताच तो बारगळणार आहे, याची ठराव आणणाऱ्या नगरसेवकांनाही पक्की खात्री आहे. ‘विरोधकांना कसे पळविले’ असे भासवत निव्वळ नेत्यांना खूष करण्यासाठीच ठराव जाहीर करण्याची तसदी घेतल्याची चर्चा आहे.यापूर्वीही असा प्रकारकसबा बावड्यातील एका पेट्रोल पंपाजवळील रिकाम्या जागेवर अशाच प्रकारे आरक्षणाचा ठराव आणण्याचा प्रयत्न दोन वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर पडद्यामागे जोरदार हालचाली झाल्या. मात्र, ‘वजन’ ठेवल्यानंतरच ठराव मागे घेण्यात आला. आरक्षण उठवता येत नाही, तर आरक्षण टाकण्याची भीती दाखवून इप्सित साध्य करण्याची ही नवीन टूम आहे.मध्यभागीच बागदक्षिण-उत्तर अशी एकूण दहा एकर असलेल्या या जागेच्या मध्यभागीच उत्तरेच्या बाजूने दोन एकर जागेवर बगीचा करण्याचा ठराव प्रस्तावित आहे. जेणेकरून बैलगाडीसाठी जाणारी वाटही बंद होऊन उर्वरित जागेचा वापर कारखान्यास करता येऊ नये, अशा पद्धतीनेच ठराव आणला आहे.कारखाना अगोदरच अत्यंत दाटीवाटीच्या जागेत आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, या उद्देशानेच कारखान्याने ही जागा घेतली. वास्तविक ही जागा १५ हजार सभासदांची आहे. अशा प्रकारे कारखाना मोडीत काढण्याचा कोणी डाव आखत असल्यास शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना संबंधितांना करावा लागेल. - दिलीप पाटील (चेअरमन, राजाराम कारखाना)