शहर व उपनगरातील अनेक हॉटेल, धाबेचालक व मांस विक्री करणारे टाकाऊ कचरा रात्री-बेरात्री खांडसरी ते शिंगणापूर रस्त्यावर आणून टाकत आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचले आहेत. हा कचरा कुजला की याचा उग्र वास परिसरात पसरतो. शिंगणापूर, हणमंतवाडी व परिसरातील कॉलनीतील ग्रामस्थांना या रस्त्यावरून येता-जाता याचा मोठा त्रास होत आहे. शिवाय या उग्र वासामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या भागात कचरा आणून टाकणाऱ्यांवर कारवाई करून हे प्रकार थांबवावेत अशी मागणी जोर धरत आहे.
कोट : शहर व उपनगर परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल, मांस विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. त्यांना हा परिसर टाकाऊ कचरा टाकण्यासाठी सोयीचा व निर्जन आहे. यामुळे खांडसरी व चंबुखडी पाण्याची टाकी दरम्यान रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसून येत असून त्यातून दुर्गंधी येते. हे फारच त्रासदायक आहे. प्रशासनाने याचा बंदोबस्त करावा. ख्रस्तोफर जॉन्सन, राज्य समन्वय, भाजप ख्रिश्चन सेल