शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षात ‘कचरा उठाव’ अभियान

By admin | Updated: January 4, 2017 00:55 IST

स्वच्छ शहराचा संकल्प : दोन बायोगॅस, तर एक खत निर्मिती प्रकल्प साकारणार

भारत चव्हाण --कोल्हापूर --शहराचे झपाट्याने होत असलेले नागरीकरण, त्यातून दैनंदिन कचऱ्याचा बनलेला गंभीर प्रश्न लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने २०१७ या नवीन वर्षात ‘स्वच्छ शहर’ करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांत शहरातील कसबा बावडा परिसरातील विघटन न होणाऱ्या कचऱ्याचे ढीग संपलेले पाहायला मिळणार आहेत. झूम प्रकल्पावरील ऊर्जानिर्मिती प्रकल्पासह उपनगरांतील कचऱ्यावर दोन बायोगॅस प्रकल्प, तर एक खतनिर्मिती प्रकल्प लवकरच साकारणार आहे. कसबा बावडा परिसरातील झूम प्रकल्पावर साचलेला कचरा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी बनली आहे. आजमितीस या ठिकाणी अडीच लाख टन विघटन न होणारा कचरा (इनर्ट मटेरिअल) साचून राहिलेला आहे. इनर्ट मटेरिअल टाकण्यासाठी टोप येथील खाण उपलब्ध न झाल्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा प्रश्न गंभीर बनला आहे; परंतु आता शहरातीलच टाकाळा खाणीत हा सर्व विघटन न होणारा कचरा टाकण्यात येणार आहे. कचरा उठाव अभियान राबवून तो झूम प्रकल्पाची साईट रिकामी केली जाणार आहे. झूमवर ऊर्जानिर्मितीझूमची जागा रिकामी झाली की त्या ठिकाणी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प साकारला जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, मुंबईस्थित रोकेम संस्थेला काम देण्यात आले आहे. महानगरपालिका ‘रोकेम’ला शहरातील दररोजचा कचरा अंदाजे १५० टन देणार असून, कंपनी त्यावर विजेची निर्मिती करणार आहे. नवीन वर्षात कचरा उठावाचे कालबद्ध अभियान राबविले जाणार आहे.बायोगॅस प्रकल्प निविदा प्रक्रिया पूर्णउपनगर भागातील चार ते पाच प्रभागांतील कचरा गोळा तो एका ठिकाणी साठविण्यात येणार आहे. तेथेच त्यावर प्रक्रिया केली जाईल. पाच ते सात हजार स्क्वेअर फूट जागेवर दोन छोटे बायोगॅस प्रकल्प उभारले जात आहेत. साधारण दोन कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया, वर्क आॅर्डरची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. पुईखडी येथील एक जागा निश्चित केली आहे; तर दुसऱ्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी कचऱ्यावर गॅस आणि गॅसचा वापर करून ऊर्जानिर्मिती करण्यात येणार आहे. मैलखड्डा येथे खतनिर्मिती संभाजीनगर ते जरगनगर रस्त्यावर असलेल्या मैलखड्डा परिसरात खतनिर्मितीचा प्रकल्प लवकरच उभा राहणार आहे. हा प्रकल्प खासगी कंपनी स्वखर्चाने उभा करणार असून, महानगरपालिका फक्त त्यांना जागा उपलब्ध करून देणार आहे. येत्या पंधरा दिवसांत त्या ठिकाणी यंत्रणा बसविण्यास सुरुवात होईल. नजीकच्या चार ते पाच प्रभागांतील कचरा गोळा करून तो दिला जाणार आहे.