शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

धुळीत हरवली ‘गंगावेश’

By admin | Updated: January 23, 2015 23:36 IST

गंगावेश चौकातील स्थिती : नागरिकांचे आरोग्य धोक्यात--‘लोकमत’-हेल्पलाईन

कोल्हापूर : शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर प्रमुख चौकांत टाकण्यात आलेल्या खडीमुळे धूळ उडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. विशेषत: गंगावेश चौक हे मध्यवर्ती ठिकाण होय. दिवस-रात्र या चौकामधून हजारो वाहने ये-जा करतात. या धुरळ्यामुळे नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. ‘खड्डा बरा; पण धूळ नको,’ असे नागरिक आता म्हणू लागले आहेत.अगोदरच शहरात सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. त्यांतील बऱ्यापैकी पॅचवर्क किंवा नवीन रस्त्याचे काम सुरू केले आहे; पण नवीन रस्ता तयार करण्यासाठी टाकण्यात आलेली खडी नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. यामधून वाहने जात असल्याने तो धुरळा उडून नागरिकांना विकार होत आहे. गंगावेश चौकातून कोकणाकडे जाणारे ट्रक, टेम्पो तसेच रंकाळा बसस्थानकामधून जात असलेल्या एस. टी. बसेसमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनलिकेचे विकार होऊ लागले आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून या रस्त्यावर खडी पडून आहे. याचा त्रास नागरिकांसह व्यावसायिकांनाही सोसावा लागत आहे. त्यामुळे सुमारे २० ते ३० टक्के व्यवसायावर परिणाम जाणवत आहे. तसेच घरातील प्रापंचिक साहित्यावरसुद्धा धूळ बसते आहे. त्याचबरोबर कौलारू घरांचा रंग बदलला आहे.‘रास्ता रोको’चा इशारा... -- गंगावेश चौकात रहिवासी व व्यावसायिकांची वस्ती आहे. साधारणत: ५० व्यावसायिक आहेत. सततच्या वाहनांमुळे विशेषत: अवजड वाहनांमुळे धूळ उडते. यामुळे नुकताच परिसरातील नागरिक, व्यावसायिक यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता; पण स्थानिक नगरसेविकेने लवकर पूर्ण रस्ता करू, असे आश्वासन दिल्याने रास्ता रोको करण्याचे स्थगित करण्यात आले असल्याचे नागरिकांनी सांगितले.ठेकेदार गेला पळून...!गंगावेश चौक ते साई मंदिर (रंकाळा बसस्थानक) या रस्त्याचे काम एका ठेकेदाराने घेतले आहे. या रस्त्यावर कच्ची खडी टाकली; पण महापालिकेने ठेकेदाराचे पैसे न दिल्याने संबंधित ठेकेदार अर्धवट काम टाकून पळून गेला आहे. त्यामुळे हा रस्ता कधी पूर्ण होणार आणि या धुरळ्यातून सुटका कधी होणार, अशी विचारणा नागरिक करू लागले आहेत.व्यवसायावर परिणाम जाणवत आहे. महापालिकेने लवकरच प्राधान्यक्रमाने हा नवीन रस्ता पूर्ण करावा. जेणेकरून धुळीच्या त्रासातून मुक्ती मिळेल.- अजय कसबेकर -जाधव, व्यावसायिकधुळीच्या बचावापासून प्रत्येक नागरिकासह वाहनधारकांनी तोंडावर मास्क लावला पाहिजे. तसेच धूळ, अ‍ॅलर्जीचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी.- डॉ. रमेश कुर्ले,फिजिशियन, कोल्हापूर.