शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीत महिलांचे दागिने लुटणाऱ्या चार महिलांची टोळी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:18 IST

कोल्हापूर : गर्दीच्या ठिकाणी महिलांचे लक्ष विचलित करून हातचलाखीने पर्समधील अथवा गळ्यातील सोन्याचे दागिने लांबविणारी परप्रांतीय चार महिलांची टोळी ...

कोल्हापूर : गर्दीच्या ठिकाणी महिलांचे लक्ष विचलित करून हातचलाखीने पर्समधील अथवा गळ्यातील सोन्याचे दागिने लांबविणारी परप्रांतीय चार महिलांची टोळी उजेडात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुजरी कॉर्नर येथे सापळा रचून त्यांना अटक केली. त्या मूळच्या कर्नाटक राज्यातील असून, त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे ११ तोळे चोरीचे दागिने जप्त केले.

अटक संशयित महिलांची नावे : पूजा अर्जुन सकट (वय ३०), अर्चना चंद्रकांत चौगुले (२१, रा. रा. बुद्धनगर, रेणुका मंदिरनजीक, निपाणी, कर्नाटक), सुवर्णा विशाल सकट (३०), मंदा सुवर्णा सकट (२८, दोघेही रा. टेंबलाई उड्डाण पुलाजवळ झोपडपट्टी, टाकाळा).

मंदिर, बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी महिलांचे दागिने चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी पथके नेमली. चार संशयित चोरट्या महिला गुजरी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून चौघींना अटक केली. त्या कर्नाटकातील असून, टेंबलाई उड्डाणपूल येथे तात्पुरत्या राहत होत्या. त्यांच्या अंगझडतीत सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे सुमारे ११ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

किरण गावडेंची खात्रीशीर माहिती

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस किरण गावडे यांना गारगोटी एस.टी. स्टँडवरील सीसी टीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या चार महिला गुजरी कॉर्नर येथे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस विजय कारंडे, श्रीकांत मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय गुरखे, हे. कॉ. उत्तम सडोलीकर, किरण गावडे, प्रदीप पोवार, वैशाली पाटील, सुप्रिया कात्रट, सारिका मोटे यांनी सापळा रचून अटक केली.

गारगोटी, आदमापुरातील चोऱ्या उघड

अटकेतील महिलांच्या टोळीने दि. १४ डिसेंबरला गारगोटी एस.टी. स्टँड व आदमापूर येथील बाळूमामा मंदिरात महिलांना सोन्याचे दागिने चोरल्याचे उघडकीस आले. दरम्यान, त्यांच्याकडून महाद्वार रोडवरील आणखी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.

फोटो नं. ०९०१२०२०-कोल-चोरी०१

ओळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कोल्हापुरातील गुजरी येथे अटक केलेल्या चौघा महिलांच्या टोळी करून जप्त केलेले चोरीचे सोन्याचे दागिने.

फोटो नं. ०९०१२०२०-कोल-पूजा सकट (आरोपी-चोरी)

फोटो नं. ०९०१२०२०-कोल-अर्चना चौगुले (आरोपी-चोरी)

फोटो नं. ०९०१२०२०-कोल-सुवर्णा जाधव (आरोपी-चोरी)

फोटो नं. ०९०१२०२०-कोल-मंदा सकट (आरोपी-चोरी)