शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गणेशवाडी पाझर तलावाची दुरवस्था

By admin | Updated: May 20, 2015 00:13 IST

शासनाचे दुर्लक्ष : भरावातून होते पाणी गळती; लाभक्षेत्राला पाणी मिळत नाही

शिवराज लोंढे - सावरवाडी -लाभक्षेत्राला पाणीपुरवठा होण्याकडे झालेले दुर्लक्ष, पाणी साठविण्याची कमी क्षमता, भरावातून होणारी पाण्याची गळती, पाच वर्षांपासून राज्य शासनाचे तलावाच्या दुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष, शेतीस अपुरा होणारा पाणीपुरवठा, पिकांचे होणारे नुकसान या समस्यांत सापडलेल्या गणेशवाडी (ता. करवीर) येथील पाझर तलावाची अवस्था सध्या बिकट बनली आहे. शासकीय पातळीवर निधी अद्याप उपलब्ध नाही.राज्य शासनाने १२ वर्षांपूर्वी गणेशवाडीत डोंगरी भागात या पाझर तलावाची निर्मिती केली. या तलावाची उंची १४.८७ मीटर आहे. तलावाचे लाभक्षेत्र २५ हेक्टर आहे.तलावाची पाणी साठवण क्षमता कमी असल्यामुळे जानेवारी ते जूनपर्यंत पाण्याची कमतरता भासते. त्यातच आठ वर्षांपासून तलावाच्या मुख्य भरावातून गळती लागली आहे. त्यामुळे पाण्याचा पुरेसा साठा होत नाही. त्यासाठी या पाझर तलावाच्या सभोवार नव्याने खुदाई करून पाणी साठवणुकीची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. तसे झाले तर परिसरातील शेकडो एकर शेती ओलिताखाली आणणे शक्य आहे. या पाझर तलावात कपडे, जनावरे धुतली जातात. पाझर तलावाच्या परिसरात मृत जनावरे टाकली जातात. त्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. तलाव परिसर दारू पिण्याचा अड्डा बनला आहे.भविष्यात जादा पाणीपुरवठा होण्यासाठी या पाझर तलावाच्या दुरुस्तीसह रुंदीकरण करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात तलावात पाणी साठते. परंतु, ठिकठिकाणी गळती लागल्यामुळे पाणी वाया जाते. मुख्य भराव्याच्या गळतीचे बांधकाम करण्यासाठी शासकीय निधी मिळत नाही. तो तातडीने मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.डोंगरी भागातील कोरडवाहू जमिनीला पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याअभावी पिके वाळू लागतात. शासनाने पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी जादा निधी मंजूर करावा.- सिंधुताई माने, सरपंच, ग्रामपंचायत गणेशवाडीगेल्या अनेक वर्षांपासून भरावातून गळती होते. पाझर तलावाच्या दुरुस्तीकडे शासनाचे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाले. त्यासाठी भरावाचे बांधकाम होणे गरजेचे आहे.- दादासाहेब लाड, संचालक, कुंभी-कासारी साखर कारखाना.