शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणरायाच्या आगमनाला आता अवघे बारा दिवस शिल्लक राहिले आहेत; त्यामुळे शहरात उत्सवाच्या आगमनाचे पडघम वाजू लागले आहेत. देव घडविणाºया कुंभारवाड्यातील लगबग, ठिकठिकाणी गणेशमूर्तींचे मांडलेले स्टॉल्स, मंडळांची मांडव उभारणी, आकर्षक विद्युतमाळा, मखरे, मंदिरांच्या लहान कटआउटस्ची मांडणी या तयारीने वातावरणात उत्साहाचे रंग भरू लागले ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणरायाच्या आगमनाला आता अवघे बारा दिवस शिल्लक राहिले आहेत; त्यामुळे शहरात उत्सवाच्या आगमनाचे पडघम वाजू लागले आहेत. देव घडविणाºया कुंभारवाड्यातील लगबग, ठिकठिकाणी गणेशमूर्तींचे मांडलेले स्टॉल्स, मंडळांची मांडव उभारणी, आकर्षक विद्युतमाळा, मखरे, मंदिरांच्या लहान कटआउटस्ची मांडणी या तयारीने वातावरणात उत्साहाचे रंग भरू लागले आहेत.गणेशोत्सव म्हणजे साक्षात देवानेच आपल्या घरी येणे. गौरी-गणपतीच्या या पाच-सहा दिवसांत वर्षभरातील सगळे ताणतणाव, दु:ख, विवंचना विसरून प्रत्येकजण आनंदोत्सव साजरा करतो. यंदा गणेशोत्सव २५ तारखेपासून सुरू होत आहे. सणाला आता काहीच दिवस शिल्लक राहिल्याने शहराला उत्सवाचे वेध लागले आहेत. त्यामुळे घरोघरी उत्सवाच्या प्राथमिक तयारीची चर्चा रंगू लागली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात वेगळी कोणती आरास करायची, यावर चर्चा झडू लागल्या आहेत.कुंभारवाड्यात रंगकामाला वेगउत्सवाची तयारी सुरू होते ती गणेशमूर्ती ठरविण्यापासून. त्यामुळे कुंभार गल्लीत तयार झालेल्या आकर्षक गणेशमूर्ती भाविकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, अद्याप तयार नसलेल्या कच्च्या गणेशमूर्तींना रंगविण्याच्या कामाला वेग आहे. गंगावेश, पापाची तिकटी आणि शाहूपुरी कुंभार गल्ली येथील प्रत्येक घराबाहेर मंडप उभारून काम सुरू आहे. दारात मांडलेल्या तयार मूर्ती आणि रंगकाम सुरू असलेल्या मूर्ती मन आकर्षून घेतात.ढोल-ताशा पथकांचा सरावआजवर केवळ पुण्याची मक्तेदारी असलेल्या ढोल-ताशा वादनात कोल्हापूरनेही पाऊल ठेवले आहे. डॉल्बीला उत्तम आणि पारंपरिक पर्याय म्हणून गेल्या तीन-चार वर्षांपासून ढोल-ताशांची क्रेझ वाढली आहे. पुण्याच्या पद्धतीला कोल्हापुरी परंपरेचा तडका देत तयार झालेल्या या ढोल-ताशा पथकांकडून जोरदार सराव सुरू आहे. अगदी लहान मुलींपासून ते महाविद्यालयीत युवक-युवतीसुद्धा या सरावात गुंतल्या आहेत. याशिवाय बँड-बेंजो पथकांकडूनही वाद्यांवर गाण्यांचा सराव सुरू आहे.मांडव उभारणीदुसरीकडे, गणेश मंडळांकडून एकीकडे वर्गणी स्वीकारणे सुरू आहे. दुसरीकडे, ठरलेल्या जागेवर मांडव उभारणीचे काम सुरू झाले आहे. मंडळांकडून दरवर्षी उत्सव समिती ठरविली जाते. त्या समितीकडून यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा करायचा, यावर नवनव्या संकल्पनांचा विचार होत आहे. शहराच्या चौकाचौकांत मंडळांचे डिजिटल फ्लेक्स लागले आहेत.मखर, कटआउट्स,विद्युतरोषणाईश्री गणेशाच्या सजावटीसाठी लागणारे मखर, मंदिराच्या आकारातील डिजिटल कटआउट्स, आणि आकर्षक विद्युतमाळा दुकानांबाहेर सजविण्यात येत आहेत. टेंबे रोडसह महाद्वार रोड, पापाची तिकटी या प्रमुख बाजारपेठांमध्ये या सजावटीच्या साहित्याची मांडणी सुरू झाली आहे.