उदगाव : उदगाव येथील कृष्णा नदीघाटावर गणेशभक्तांनी विसर्जनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रदूषणाची हानी टाळावी यासाठी ड्रीम फाउंडेशन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मूर्ती दान कार्यक्रम पार पडला. यावेळी अकराशे मूर्ती दान केल्या.
उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदी घाटावर घरगुती गणपती विसर्जनासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती या थेट नदीत विसर्जन केल्याने प्रदूषण होते व त्याचा परिणाम उद्भवतो याचा विचार करून गेले सात वर्षे उदगाव येथे ड्रीम फाउंडेशनकडून सामाजिक उपक्रम राबविण्यात येतो. या मूर्तींचे विसर्जन नदीशेजारील एका मोठ्या विसर्जन कुंडाला प्लास्टिक कागदाचे आवरण तयार करण्यात येते. त्यामध्ये सोडा टाकून विधीपूर्वक विसर्जन करण्यात येते, तर निर्माल्य गोळा करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. त्याचा उपयोग कम्पोस्ट खत तयार करण्यासाठी करतात. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी सरपंच कलीमून नदाफ, उपसरपंच रमेश मगदूम, ग्रा.पं. सदस्य दिलीप कांबळे, जगन्नाथ पुजारी, ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी, पोलीस पाटील अनुराधा कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - १४०९२०२१-जेएवाय-०८
फोटो ओळ - उदगाव (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीवर गणेशमूर्तींचे दान करण्यात आले.