शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा गणेशोत्सव

By admin | Updated: September 15, 2015 01:04 IST

अभिनव कल्पना : मूर्तींपासून देखाव्यांची माहिती

संतोष मिठारी / कोल्हापूर पारंपरिक व आधुनिकतेचा संगम असलेल्या कोल्हापूरच्या गणेशोत्सवाची माहिती वेबसाईट आणि फेसबुक पेजच्या पुढे जाऊन थेट ‘मोबाईल अ‍ॅप’द्वारे यावर्षी मिळणार आहे. अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे त्यासाठी ‘गणेशोत्सव २०१५’ हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. त्यात शहरासह जिल्ह्यातील विविध मंडळांची गणेशमूर्ती, देखावे, त्यांच्याकडून राबविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती मिळणार आहे. संजय घोडावत ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचा वैभव वाडकर व गिरीष पटेल, धनंजय महाडिक ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनचा नंदकुमार माने आणि भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचा अल्तमेश काझी या विद्यार्थ्यांनी ‘गणेशोत्सव २०१५’ अ‍ॅपची निर्मिती केली आहे. अवघ्या वीस दिवसांत त्यांनी अ‍ॅप साकारले आहे. त्यात गणेश मंडळे तसेच वापरकर्ते (युजर) यांच्या नोंदणीची सुविधा आहे. नोंदणी केल्यानंतर मंडळांना आपल्या गणेशमूर्तीची छायाचित्रे, मंडळाच्या उपक्रमांची तसेच देखाव्याची माहिती नोंदविता येणार आहे. आतापर्यंत २५ हून अधिक मंडळांनी अ‍ॅप्लिकेशनवर माहितीची नोंद केली आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळे, त्यांच्या कार्यक्रमांची तसेच मानाच्या गणपतींची माहिती मिळणार आहे. शिवाय पोलीस, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा अशा अत्यावश्यक सुविधांचे क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. मंडळांच्या उत्सव काळातील कार्यक्रमांची ‘इव्हेंट’या सदरात नोंद करून ती पाठविल्यास एकाचवेळी सर्व वापरकर्त्यांना ती नोटिफिकेशनसह समजणार आहे. बी. ई. कॉम्प्युटर सायन्स व सिव्हील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी साकारलेले हे अ‍ॅप कार्यकर्ते आणि गणेशभक्तांसाठी उपयुक्त ठरणार आहे.