शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची हेल्मेटसाठी ‘गांधीगिरी’

By admin | Updated: July 13, 2017 00:43 IST

वाहतूक शाखेकडून गुलाबपुष्प : शहरातील पाच चौकांमध्ये केले प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अपघातामध्ये ‘हेल्मेट’ न घातल्याने अनेक दुचाकी वाहनधारकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे हेल्मेट वापराचे महत्त्व पटवून देण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना दंड आकारण्याऐवजी गुलाबपुष्प देऊन अनोख्या, गांधीगिरी पद्धतीने दुचाकीस्वारांचे बुधवारी प्रबोधन करण्यात आले. आरएसपी व शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शहरातील पाच चौकांत पोलिसांतर्फे प्रबोधन केले.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने राज्यात सर्वच ठिकाणी हेल्मेटसक्ती केली आहे. जे हेल्मेट वापरत नाहीत, त्या वाहनधारकांवर ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली जात आहे. तत्पूर्वी वाहनधारकांना सूचना व हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोरे यांच्यासह कर्मचारी, शहरातील वेगवेगळ्या शाळांतील ‘एनसीसी’चे छात्र व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत जे दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत त्यांना ‘हेल्मेट का वापरायचे?’ याची माहिती लिहिलेले पत्रक व गुलाबपुष्प देऊन त्यांचे प्रबोधन केले. सीपीआर रुग्णालयासमोरील चौक, दाभोळकर कॉर्नर, राजारामपुरीतील जनता बझार, ताराराणी चौक, शिवाजी पूल या ठिकाणी प्रबोधन करण्यात आले.सर सलामत तो पगडी पचास...!वाहतूक शाखेच्या वतीने वाटण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये सर सलामत तो पगडी पचास... असा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला होता. यासह वाहतुकीचे नियम आणि लेनची शिस्त पाळा, सिग्नल दिशादर्शक फलक आणि पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन करू नका, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करू नका, वाहन चालविताना मोबाईल वापरू नका, ट्रिपल सीट प्रवास करू नका, वाहन चालविताना घाई-गडबड करू नका, असे नियम लिहिण्यात आले होते. कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे बुधवारी सीपीआर रुग्णालयासमोरील चौकात वाहनधारकांना गुलाबपुष्प व वाहतुकीचे नियम सांगणारे परिपत्रक देऊन हेल्मेटबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती करताना शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ उपस्थित होते.