शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

शिवाजी विद्यापीठात साकारणार ‘गांधी कुटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:05 IST

संतोष मिठारी।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महात्मा गांधी यांचा जीवनप्रवास आणि कार्याचा प्रचार, प्रसार करण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठात ‘गांधी कुटी’ साकारण्यात येणार आहे. विद्यापीठातील गांधी अभ्यास केंद्राने हा प्रकल्प हाती घेतला आहे. वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केंद्राने केले आहे.या केंद्राने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विद्यापीठामध्ये ‘गांधी कुटी’ ...

संतोष मिठारी।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महात्मा गांधी यांचा जीवनप्रवास आणि कार्याचा प्रचार, प्रसार करण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठात ‘गांधी कुटी’ साकारण्यात येणार आहे. विद्यापीठातील गांधी अभ्यास केंद्राने हा प्रकल्प हाती घेतला आहे. वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केंद्राने केले आहे.या केंद्राने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विद्यापीठामध्ये ‘गांधी कुटी’ साकारण्याचा निर्णय घेतला आहे. एक एकर जागेमध्ये ही कुटी वर्धा आणि साबरमती आश्रम नजरेसमोर ठेवून उभारली जाणार आहे. त्यासाठी पारंपरिक साधने आणि साहित्याचा वापर केला जाईल. या कुटीमध्ये गांधीजी यांचा जीवनप्रवास, कार्यावर आधारित छायाचित्रे आणि पुस्तकांचे प्रदर्शन असणार आहे. अभ्यास केंद्राचे कार्यालय येथे राहणार आहे. कुटी साकारण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.विद्यापीठात ‘गांधी कुटी’ उभारण्याचा उद्देश हा महात्मा गांधी यांचे जीवन, कार्य आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करणे हा आहे. या कुटीच्या प्रकल्पाचा प्राथमिक स्वरूपातील आराखडा विद्यापीठाला सादर केला असल्याचे गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक प्रा. डॉ. भारती पाटील यांनी सांगितले. लोक वर्गणीतून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असून समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी यासाठी मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.‘गांधी कुटी’ साकारण्याबाबतचा प्राथमिक स्वरूपातील प्रस्ताव गांधी अभ्यास केंद्राने मांडला असून त्यावर लवकरच कार्यवाही केली जाईल.-कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे