शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

ज्याची खावी पोळी, त्याचीच वाजवावी टाळी!

By admin | Updated: May 5, 2017 23:14 IST

ज्याची खावी पोळी, त्याचीच वाजवावी टाळी!

श्रीनिवास नागेस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोल्हापुरातील मोर्चाला सदाभाऊ खोत येणार नाहीत, ही भाकड भाकितं खोटी ठरली. नव्हे, सदाभाऊंनी ती खोटी ठरवली. ते अलीकडं पक्के राजकारणी बनलेत. कुठं जायचं अन् कुठं जायचं नाही, हे त्यांना मुरब्बी नेत्याप्रमाणं पक्कं कळतंय. खासदार राजू शेट्टींनी आष्ट्यात घेतलेल्या शेतकरी मेळाव्यास दांडी मारल्यानंतर अन् शेट्टींनी अप्रत्यक्षपणे (हातचा राखून!) तोफा डागल्यानंतर संघटनेत निर्माण झालेली अस्वस्थता त्यांनी ओळखलीय. त्यातच त्यांना शेतकऱ्यांची गरज असेल, तर ते मोर्चासाठी येतील, असा ‘अल्टिमेटम’ खासदार शेट्टींनी मोर्चाच्या दोन दिवस आधी दिला. त्यामुळं सदाभाऊ खास मोर्चासाठी मुंबईहून आले. मोर्चात सामील झाले आणि तडाखेबंद भाषण ठोकून निघून गेले. ‘मिसरूड फुटायच्या आधीपासून मी संघटनेत काम करतोय. परंतु दाढी-मिशा फुटल्यानंतर संघटनेत आलेले माझ्याबद्दल शंका घेताहेत. कुणाच्या मेहेरबानीवर नव्हे तर शेतकऱ्यांमुळं मंत्री बनलोय’, असं खुद्द शेट्टींसमोर सुनावणाऱ्या सदाभाऊंचा रोख कुणाकडं होता, हे तिथं जमलेल्यांना तर नक्कीच कळलं असणार. शेट्टी यांच्या सूचक इशाऱ्यांना दिलेलं ते चोख उत्तर होतं. गेल्या तीन-चार महिन्यांपासून दोघांतला कलगीतुरा अनेक प्रसंगांतून चव्हाट्यावर आलाय. विशेष म्हणजे नंतर हळूच सावरासावर केली जाते. (ती राजकीय अपरिहार्यता.) अर्थात कितीही गुंडाळागुंडाळी केली असली तरी दोघांतला बेबनाव लोकांच्या नजरेतून सुटलेला नाही.चळवळीतल्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष विधिमंडळात प्रश्न मांडून, सत्तेत जाऊनच चळवळीचे प्रश्न सोडवून घ्यावे लागतात. त्यासाठी खासदार शेट्टी यांनी केंद्रातल्या भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्यातही त्यांचा पक्ष भाजप सरकारचा घटकपक्ष आहे. त्यातूनच सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रिपद मिळालंय. कृषी, पणन, आरोग्य, पाणीपुरवठा अशी चार-चार खाती ते सांभाळताहेत. अर्थात त्यासाठी भाजपच्या किती नाकदुऱ्या काढाव्या लागल्या अन् किती आदळआपट करावी लागली, हे सारा महाराष्ट्र जाणतो! घटकपक्षांना चुचकारायचं, जवळ घ्यायचं अन् संधी मिळाली की, तो पक्षच संपवायचा, ही भाजपची खेळी शेट्टी यांनी ओळखलीय, पण सत्तासुंदरीला भुललेल्या सदाभाऊंना ते अजून समजलेलं नाही, असं संघटनेतला एक प्रवाह म्हणतो... त्यावर मात्र सदाभाऊ शांत बसतात. नव्हे, सरकारची भलावण करतात. हल्ली तर भाजप सरकारचं प्रवक्तेपद मिळाल्यासारखी सदाभाऊंची भाषणं असतात. अर्थात ‘ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी’, असं काय उगाच म्हणतात?आपण भुलून भाजपवाल्यांच्या मागं गेल्याचं, परंतु वाट्याला मात्र कडकडीत ऊन आल्याचं गुरुवारी कोल्हापुरातल्या मोर्चात शेट्टींनी कबूल केलं. मात्र मोर्चाला येण्यापूर्वी म्हणे सदाभाऊंची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली! शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमुक्त करायचं आहे, असं त्यांना मुख्यमंत्र्यांनी (हळूच कानात) सांगितलं म्हणे! त्याउपरही खासदार शेट्टींनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २२ मेपासून पुणे ते राजभवन अशी आत्मक्लेश पदयात्रा काढण्याचं जाहीर केलं. सदाभाऊंचं सरकारात वजन आहे अन् सरकारवर एवढा दांडगा विश्वास आहे, तर मग त्यांनी खा२२सदार शेट्टींना थांबवून दाखवावं. (खरं तर आंदोलन जाहीर करण्यापासूनच त्यांनी शेट्टींना रोखलं का नाही?) अन्यथा सदाभाऊ हे एक सामान्य राज्यमंत्री असून, त्यांना मर्यादित अधिकार आहेत, ते शेतकऱ्यांबद्दल निर्णय घेऊ शकत नाहीत, हे खासदार शेट्टींचं म्हणणं मुकाट्यानं मान्य करून सदाभाऊंनी सरकारचा उदोउदो थांबवावा. (ते सरकारचा उदोउदो करतात, हे शेट्टींचंच म्हणणं हं!) ... पण असं करतील ते सदाभाऊ कसले! आंदोलनात काठ्या खाल्ल्यामुळं, डोकी फोडून घेतल्यामुळं, जेलमध्ये गेल्यामुळं ते शेतकऱ्यांचे ‘नेते’ बनलेत. एवढं राबराब राबून केलेल्या मशागतीनंतर त्या जमिनीत पीक (मंत्रीपद अन् त्याचे लाभ!) घ्यायची वेळ आल्यावर हातातला कोयता खाली ठेवायचा का? अन् ते भरघोस पीक घेऊ देणाऱ्या भाजपला शिव्या घालून काडीमोड घ्यावा का?जाता-जाता : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बागणी मतदारसंघातून सदाभाऊंचा मुलगा सागरच्या पदरी पराभव पडला. तो पडण्यामागं खासदार शेट्टींचा विरोध, हेही एक कारण होतं. सागरला उभा करताच शेट्टींनी घराणेशाहीचे दाखले देत सदाभाऊंना कानपिचक्या दिल्या होत्या. पण सदाभाऊंनी त्यावेळीही ‘मशागत अन् पीक काढणी’चा सवाल केला होता. मात्र त्यानंतर शेट्टी तिथं प्रचाराला गेले नव्हते. (शेजारच्या मतदारसंघात मात्र त्यांनी सभा घेतल्या.) त्यामुळं सदाभाऊ खप्पा झाले. शिवाय ज्या गावांत लोकसभेला शेट्टींना पाच-सहाशे मतांचं ‘लीड’ मिळतं, जिथल्या ग्रामपंचायतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सदस्य आहेत, त्या गावांमध्ये सागर दोन-दोनशे मतांनी कसा मागं पडतो, हा सवाल त्यांचं मन कुरतडतोय. पण शेट्टींना विचारायचं धारिष्ट्य सदाभाऊ दाखवू शकत नाहीत... कारण ते कधीचेच भाजपच्या ‘पोळी’चे भागीदार बनलेत!ताजा कलम : सदाभाऊंचा सरकारातला व्याप पाहून (की पावलं ओळखून?) खासदार शेट्टींनी त्यांना संघटनेच्या सर्व पदांतून मुक्त केलंय. प्रदेशाध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रकाश पोकळे यांनी निवड केलीय. मागंही एकदा सदाभाऊंना प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं होतं... (पण नंतर ते कधी प्रदेशाध्यक्ष झाले, की आणखी कुणाला अध्यक्ष केलं, हे मात्र गुलदस्त्यातच राहिलं.) ‘सांगताही येईना अन् सहनही होईना’, या अवस्थेच्या पुढं गेल्यानंतरच असा निर्णय होत असावा बहुधा!