शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खेळ दिलबहार (ब)चा, विजय पाटाकडील (अ)चा

By admin | Updated: February 10, 2015 00:37 IST

अवधूत घारगे स्मृतिचषक : ऋषिकेश मेथे-पाटीलचा एकमेव गोल

कोल्हापूर : ऋषिकेश मेथे-पाटीलच्या एकमेव गोलवर पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने दिलबहार तालीम मंडळ (ब)चा १-० असा पराभव करीत अवधूत घारगे चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामन्यात ‘दिलबहार’ (ब)च्या खेळाडूंनी अटीतटीचा खेळ करीत बलाढ्य पाटाकडील (अ)ला तब्बल ५७ व्या मिनिटांपर्यंत गोल करण्यापासून रोखून धरल्याने उपस्थित क्रीडारसिकांना या सामन्यात चुरस पाहण्यास मिळाली.येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर सोमवारी दिलबहार (ब) व पाटाकडील (अ) यांच्यात सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दिलबहार (ब)कडून शशांक माने, स्वप्निल भोसले, सुशील माने, लखन मुळीक, निखिल कुलकर्णी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सातत्याने चेंडू पाटाकडील(अ)च्या गोलक्षेत्रात ठेवला. पाटाकडील(अ)कडून विन्सेंट, अक्षय मेथे-पाटील, अजिंक्य नलवडे, ऋषिकेश मेथे-पाटील यांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, योग्य समन्वयाअभावी त्यांच्या गोल करण्याच्या अनेक संधी वाया गेल्या. उलट दिलबहार(ब)ने पूर्वार्धात उत्कृष्ट खेळ करीत पाटाकडील(अ)वर वारंवार चढाया करीत सामन्यावर वर्चस्व राखले. पूर्वार्धात दिलबहार (ब)ने सामन्यावर वर्चस्व निर्माण केले होते. पाटाकडील (अ) संघात ऋषिकेश मेथे-पाटील, सैफ हकीम, रुपेश सुर्वे, नियाज पटेल,अक्षय मेथे-पाटील असे एकापेक्षा एक स्टार खेळाडू असतानाही दिलबहार(ब)ने झुंजविले. उत्तरार्धात पाटाकडील(अ)कडून आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन करीत दिलबहार(ब) च्या गोलक्षेत्रात गोल करण्यासाठी अनेकदा धडक मारण्यात आली. यामध्ये पाटाकडील(अ)च्या रुपेश सुर्वे, नियाज पटेल, ऋषिकेश मेथे-पाटील, अक्षय मेथे-पाटील, विन्सेंट यांनी कधी डाव्या बाजूने, तर कधी उजव्या बाजूने चढाई करीत गोल करण्याचे प्रयत्न केले. सातत्याने आक्रमणे दिलबहार(ब)च्या बचाव फळीकडून परतावल्या जात होत्या. ५७ व्या मिनिटास पाटाकडील(अ) च्या ऋषिकेश मेथे-पाटील याने मैदानी गोल करत गोलशू्न्यची कोंडी अखेर फोडली. १-० ने मागे असलेल्या दिलबहार(ब)ने गोल फेडण्यासाठी जंग जंग पछाडले. दिलबहार(ब)कडून शशांक माने, निखिल कुलकर्णी, लखन मुळीक यांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, पाटाकडील(अ) चा गोलरक्षक शैलेश पाटील याने ते परतावून लावले. अखेरच्या काही क्षणात पाटाकडील(अ) कडून रुपेश सुर्वे, धैर्यशील पवार यांच्या गोल करण्याच्या सोप्या संधी वाया गेल्या. अखेरपर्यंत दिलबहार(ब)ला सामन्यात कमबॅक करता न आल्याने सामना पाटाकडील (अ) ने १-० असा जिंकला. (प्रतिनिधी)