लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : पाटोळेवाडी येथील गजानन नागरी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सभा व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे पार पडली. येत्या वर्षात कसबा बावडा, कळंबा या दोन ठिकाणी नवीन शाखा व संस्थेचे एटीएम कार्डद्वारे व्यवहार सुरू करण्याचा मनोदयही राजाराम पाटोळे यांनी व्यक्त केला. यानिमित्त सभासदांना १५ टक्के लाभांश व प्रत्येकी एक लिटर गोडेतेल वाटप करण्यात आले.
संस्थापक अध्यक्ष राजाराम पाटोळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे सभासदांशी चर्चा होऊन त्यात सभेमधील सर्व विषयांना मंजुरी घेण्यात आली. सभासदांनी संस्थेच्या कारभाराविषयी समाधान व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक सरव्यवस्थापक अजित पाटोळे यांनी केले. संस्थेच्या एकूण ३४ कोटींच्या ठेवी, तर कर्जे २१ कोटी रुपयांची आहेत. भागभांडवल २.४१ कोटी आहे.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा अमृता पाटोळे यांनी आभार मानले. यावेळी नंदकुमार पाटोळे, सतीश पाटोळे, प्रा. सुनील भोसले, प्रकाश पाटोळे, दिलीप पाटोळे, किरण पाटोळे, राजेंद्र भोसले, राजकुमार तोडकर, रूपाली पाटोळे, धनंजय सरदेसाई, नितीन पाटाेळे, आदी उपस्थित होते.