शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडा ग्रामपंचायतीत गैरव्यवहार

By admin | Updated: December 26, 2014 23:47 IST

कारवाईसाठी उपोषण : पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, दबाबापोटी दोषींवर थेट कारवाई नाही

भीमगोंडा देसाई-कोल्हापूर -गगनबावडा ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार व नियमबाह्य कामे केल्याचे वेळोवेळी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. सन २००९ पासून तेथील कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. परंतु, दबावाला बळी पडून दोषींवर थेट कारवाई न करता अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवित आहेत. त्यामुळे नुकतेच काही ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले. परिणामी, ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.ग्रामपंचायत गट नंबर ६, ३४, ३५ व मुलकीपड गट नंबर ५ मधील झाडे तत्कालीन ‘कारभाऱ्यां’नी सन २००९ मध्ये तोडण्याची प्रक्रिया राबविली. शासनाचे नियम धाब्यावर बसवून मे २०१० मध्ये कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. संबंधित ठेकेदाराने ग्रामपंचायतीने दिलेल्या परवानगीपेक्षा ७० ते ८० टक्के जादा वृक्षतोड केली. तसेच वृक्षतोड करण्यापूर्वी लिलावाची रक्कम ९३ हजार रुपये भरून घेतलेले नाहीत. परिणामी, ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा प्रकारे बोगस लिलाव विक्री व बेकायदेशीर वृक्षतोड केली आहे.सरकारी जागेमध्ये घराचे पक्के बांधकाम करून अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून गगनबावडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी चौकशी करून तो चौकशी अहवाल २१ जून २०१४ रोजी जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. ग्रामपंचायतीशी ११ महिन्यांचा भाडेपट्टीचा करार १०० रुपयांच्या साध्या मुद्रांकावर करूनही संजय वरेकर, अमर पाटील, रेश्मा हवलदार, अविनाश संकपाळ यांनी ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ५७७ मधील जुन्या नळ पाणीपुरवठा विहिरीजवळील जागेमध्ये पक्की बांधकामाची घरे बांधली आहेत; परंतु या चौघांनी ग्रामपंचायतीसोबत केलेल्या कराराचा भंग केला आहे. भाडेपट्टीने दिलेल्या जागेवर पक्के बांधकाम करू नये, यासाठी ग्रामपंचायतीने विरोध केला नाही. सार्वजनिक शौचालयालगतच संजय वरेकर यांनी नागरिकांना येता-जाता येणार नाही, अशाप्रकारे घराचे पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. उत्पन्नातील १५ टक्के वाटा मागासवर्गीयांच्या विकासासाठी खर्च करणे शासन नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, सन २००८-०९ ते २०१२-१३ अखेर ग्रामपंचायतीने ज्या-त्या वर्षी निधी खर्च केलेला नाही. मागासवर्गीयांनाच विकासापासून वंचित ठेवले असून, बोगस, पोकळ खर्च दाखवून अपहार केला आहे. (पुर्वार्ध )गेली काही वर्षे गगनबावडा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी यांच्याकडून मनमानी कारभार सुरू आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार केली आहे. नळ पाणीपुरवठा योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. मात्र, कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कारवाई त्वरित करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. यावेळी प्रशासनाकडून आठ दिवसांची मुदत दिली आहे.- गिरीश प्रभूलकर, तक्रारदार.तपासणीत ठेवल्या त्रुटी...उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २० नोव्हेंबर २०१४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन कारभाराची तपासणी केली. तपासणीत ग्रामपंचायतीने करवसुली नमुना नंबर ९ प्रमाणे सर्व खातेदारांना मागणी बिले १२९/१ लागू केलेली नाहीत. करवसुली एकूण मागणी रक्कम ६ लाख ७६ हजार ३५० आहे. मात्र, १९ टक्के इतकीच करवसुली झाली आहे. मासिक सभा इतिवृत्त २०१४ पर्यंत लिहिले आहे; पण त्यावर सरपंच, ग्रामसेवक यांच्या सह्या नाहीत. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्याचे इतिवृत्त लिहिलेले नाही. वर्षनिहाय दप्तराचे अ, ब, क, ड मध्ये अभिलेख वर्गीकरण केलेले नाही. तसेच ग्रामपंचायतीकडील नमुना नंबर १ ते २७ मधील नवीन नमुन्यामध्ये दप्तर ठेवलेले नाही