शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

गगनबावडा परिसर पर्यटकांनी बहरला, वर्षा पर्यटनासाठी गर्दी :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:22 IST

साळवण : हिरव्या वनराईतून झेपावणारे निर्झर , गगनाला गवसनी घालणाºया पर्वतरांगा, धुक्यात लपलेली पर्वत शिखरे, दऱ्याखोऱ्या, धुवाधार पाऊस, सोसाट्याचा वारा, आणि आकाशातून पळणाऱ्या मेघमाला असे नयनरम्य स्वर्गीय सौंदर्य मनमुराद लुटण्यासाठी पर्यटकांची वर्षा सहलीच्या निमित्ताने गगनबावड्यावर एकच गर्दी होते आहे.धो धो कोसळणारा पाऊस शांतपणे झेलणाऱ्या पर्वतराई आणि त्यातून बेफाम धावणारे लाल ...

ठळक मुद्देहिरव्या वनराईतून झेपावणारे निर्झर, धुक्यात लपलेली पर्वत शिखरे, दऱ्याखोऱ्या, धुवाधार पाऊस

साळवण : हिरव्या वनराईतून झेपावणारे निर्झर , गगनाला गवसनी घालणाºया पर्वतरांगा, धुक्यात लपलेली पर्वत शिखरे, दऱ्याखोऱ्या, धुवाधार पाऊस, सोसाट्याचा वारा, आणि आकाशातून पळणाऱ्या मेघमाला असे नयनरम्य स्वर्गीय सौंदर्य मनमुराद लुटण्यासाठी पर्यटकांची वर्षा सहलीच्या निमित्ताने गगनबावड्यावर एकच गर्दी होते आहे.

धो धो कोसळणारा पाऊस शांतपणे झेलणाऱ्या पर्वतराई आणि त्यातून बेफाम धावणारे लाल भडक पाणी बघताना पाण्याच्या रौद्र रूपाची प्रचिती तर येतेच, पण याला महाराष्ट्राची चेरापुंजी का म्हणतात याची जाणिव होते. मऊ धुक्याच्या पांढºया शुभ्र रजईतून फिरताना आणि त्यांचा स्पर्श अनुभवताना अंगावर रोमांच उभे राहतात. धुक्यातुन पर्वतरांगाचा माथा आणि दºयाखोºया भरून राहिलेले धुके बघताना काश्मिरची आठवण येते . तर नयनरम्य निसर्ग सौंदर्यासह तरल धुक्यातील बोचरी थंडी अंगाखांद्यावर घेत हिंडताना गगनबावडा म्हणजे प्रति महाबळेश्वर आहे, याची जाणीव मनाला होते.

करूळ घाटातील यू वळणावरून चौफेर दिसणारी कोकणातील ईवली ईवली घरे आणि कोसळणारे धबधबे बघताना अंगावर रोमांच उभे राहतात . कडेकपारीतील हिरवळीतून नागमोडा जाणारा घाटरस्ता आणि समोर दिसणारा गगनगिरी यांच्या दशर्नामुळे मनाचे आणि डोळ्यांचेही पारणे फिटते. तर मागील बाजूला असणारी दरी बघून अंगाचा थरकापही होतो . घाटात कोसळणाºया धबधब्याखाली मनोसक्त अंघोळ करणारे पर्यटक बघून त्यांचा हेवाही वाटतो.

आपणही धबधब्याखाली चिंब ना नसेना पण तुषार तरी झेलावेत या मनिषाने पावले आपोआप त्या धबधब्याकडे वळतात .भूईबावडा घाटात उतरतानाच खोदलेल्या सस्त्याच्या दोन्ही कपारीतून पडणारे पाणी बघता आपण पाताळात तर उतरत नाही ना असा भास होतो . पण घाट वळण येताच समोर दिसणाऱ्या हिरव्यागार डोंगर टेकड्या आणि उतरत्या छप्पराची घरे बघता आपण कोकणातील निसर्गसौंदर्य न्याहळण्यात स्वत:ला हरवून जातो. उभ्या खडकाच्या कवेतून जाणारा घाटरस्ता आणि कोसळलेल्या दरडी बघून नकळत करूळ घाट आणि भुईबावडा घाट यांची सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून तुलना होते.पण नजरेच्या टप्या पलिकडेही पसरलेल्या हिरव्यागार पर्वतरांगा आणि त्यांचे सौंदर्य बघता कोकणातील सौंदर्य मनाला मोहिनी का घालते याचे उत्तर मिळते आणि क्षणभर मनाला पडलेली भीती कुठल्या कुठे पळून जाते.निसर्गाचा खजिनासभोवताली हिरवी कंच झाडी आणि त्याच्यामध्ये लहरणारे पाणी बघताना आपण क्षणभर का होईना देहभान विसरतो. सांडव्यातून मोत्यासारख्या फेसाळत जाणाºया शुभ्र धारा बघून आपण कोणत्या नंदनवनात आहोत असा प्रश्न पडतो. पहावे तिकडे हिरवीगार वृक्षराजी त्यातून झेपावणाºया शुभ्र जलधारा, गिरीशिखरांना लपेटलेली धुके, ओथंबत जाणाºया धनमाला, केव्हा सुसाट तर केव्हा सळसळत जाणारा वारा असे मनमोहक निसर्गाची रूपे आपण कळे गाव सोडताच दृष्टीला पडतात. असाच निसर्ग सौंदर्याचा अनोखा खजिना आपल्याला संपूर्ण तालुक्यात पहायला मिळतो . खरोखरीच वर्षा सहलीचा मनमुराद आनंद लुटायचा असेल तर गगनबावड्यासारखे दुसरे ठिकाण नाही .पर्यटन आणि मनमुराद भिजल्यानंतर लागलेली भूक शमवण्यासाठी खास कोकणी पद्धतीचे जेवण, गरमा गरम वाफाळणाºया चहासाठी हॉटेल्स आपल्या स्वागतासाठी उभी आहेत.