शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

गडमुडशिंगीतील सव्वाआठ लाखांची घरफोडी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST

अटक संशयितांची नावे अशी : ऋतुराज सुनील शिंदे (वय २६, रा. माळवाडी, गडमुडशिंगी, ता. करवीर), महेश बालाजी डोंगळे (२५ ...

अटक संशयितांची नावे अशी : ऋतुराज सुनील शिंदे (वय २६, रा. माळवाडी, गडमुडशिंगी, ता. करवीर), महेश बालाजी डोंगळे (२५ रा. छत्रपती कॉलनी, गडमुडशिंगी), रवी राजाराम पोवार (३२ रा. शिरगाव गल्ली, गडमुडशिंगी), तौफिक बाबासाहेब मुल्ला (२८, रा. मदिना कॉलनी, विक्रमनगर), अझरुद्दीन सलिम सय्यद (३२ अष्टविनायक काॅलनी, विक्रमनगर).

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गडमुडशिंगी येथील जमाल मुल्ला यांचा बांधकाम व जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. दि. ६ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी पावणेसहा वाजता आपल्या पत्नीसह ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. दोन तासांनी घरी परतले असता घरातील तिजोरीतील सुमारे ८ लाख २० हजारांची रोकड लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दिली.

कोणताही पुरावा नसताना घरफोडी उघडकीस आणणे पोलिसांसमोर आव्हान होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे हे. कॉ. श्रीकांत मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने सापळा रचून शनिवारी दुपारी ऋतुराज शिंदे व महेश डोंगळे यांना संशयावरून गडमुडशिंगीतील टेंबलाई मंदिरनजीक ताब्यात घेतले. खाक्या दाखवताच त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडील माहितीनुसार तौफिक मुल्ला, अझरुद्दीन सय्यद, रवी पोवार यांनाही अटक केली. त्यांनीही संगनमताने ही घरफोडी केल्याची कबुली दिली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो. नि. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनायक सपाटे, हे. कॉ. श्रीकांत मोहिते, विजय कारंडे, किरण गावडे, वैभव पाटील, कुमार पोतदार, उत्तम सडोलीकर, प्रदीप पोवार, अमर वासुदेव, रणजित कांबळे, अजय काळे, किरण भोगण, राजेंद्र वराडकर, नामदेव यादव यांनी केली.

सीसीटीव्ही चित्रण सापडू नये म्हणून ‘डीव्हीआर’च गायब

घरमालक मुल्ला यांनी घराच्या मुख्य दरवाजाच्या, बेडरूमच्या तसेच तिजोरीच्या चाव्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या असतानाही चोरट्याने शक्कल लढवून तिन्हीही चाव्या मिळवून रोकड लंपास केली होती. सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज मिळू नये म्हणून चोरट्यांनीच ‘डीव्हीआर’च गायब केला होता. त्यामुळे घरफोडीमध्ये घरचा भेदी असण्याची अगर हा चोरीचा बनाव असावा, अशी शंका व्यक्त केली. त्यादृष्टीने तपास करताना घरफोडीचा उलगडा झाला.

फोटो न. २१०२२०२१-कोल-ऋतुराज शिंदे (आरोपी)

फोटो न. २१०२२०२१-कोल-महेश डोंगळे (आरोपी)

फोटो न. २१०२२०२१-कोल-तौफिक मुल्ला (आरोपी)

फोटो न. २१०२२०२१-कोल-अझरुद्दीन सय्यद (आरोपी)

फोटो न. २१०२२०२१-कोल-रवी पोवार (आरोपी)