शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विनोदाच्या धबधब्यात गडहिंग्लजकर चिंब

By admin | Updated: April 12, 2017 00:29 IST

पु. लं.चा जीवनपट विविध प्रसंगांतून उलगडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून झाला

गडहिंग्लज : महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे यांच्या साहित्य व आधारित गीत, नाट्य, चित्रपट, एकपात्री प्रयोग, अभिवाचन आणि विनोद आदींच्या ‘पुलांगण’ या संगीतमय कार्यक्रमाने येथील रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. किंबहुना, स्वरांच्या बरसातीत आणि विनोदाच्या धबधब्यात गडहिंग्लजकर चिंब झाले.संत गजानन महाराज शिक्षण समूह व केदारी रेडेकर फौंडेशन यांच्या सहकार्याने येथील रसिका तुझ्याचसाठी या संस्थेतर्फे आयोजित हा कार्यक्रम पालिकेच्या शाहू सभागृहात पार पडला. कोल्हापूरच्या कलांजली विद्यार्थी संघ व षडज्गंधार यांनी हा कार्यक्रम सादर केला.‘इंद्रायणी काठी’, ‘नाच रे मोरा’, ‘कौसल्येचा राम बाई’, ‘पाऊस भिजतो’, ‘माझ्या कोंबड्याची शान’, ‘येथेच टाका तंबू’ या गीतांना श्रोत्यांची विशेष दाद मिळाली. सौजन्य सप्ताह, व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, उपवास, आदींच्या अभिवाचनाने मैफिलीत रंगत आणली. वैदेही जोशी यांनी बहारदार निवेदन केले.पु. लं.चा जीवनपट विविध प्रसंगांतून उलगडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून झाला. यात राधिका ठाणेकर, सुनील जोशी, निखिल जोशी, सुधीर जोशी, रोहित जोशी, पराग ठाणेकर, रविराज पवार, मिताली जोशी, प्रियांका मोघे यांनी भाग घेतला. त्यांना विजय पाटकर यांनी हार्मोनिअम साथ, तर संदेश खेडेकर यांनी तबला साथ दिली. ध्वनी संयोजन शेखर गुळवणी यांचे होते. यावेळी नगरसेविका श्रद्धा शिंत्रे, डॉ. अनंत मुजुमदार, पी. डी. देशपांडे, रवींद्रनाथ जोशी, अनुजा बेळगुद्री, अरुण कोटगी-बेनाडीकर, आदींसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी गाणसरस्वती किशोरी आमोणकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रा. श्रीकांत नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.