शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

गडहिंग्लजला सोयीचे राजकारण..आघाड्याही सोयीच्या..!

By admin | Updated: February 13, 2017 23:49 IST

राष्ट्रवादीचे विरोधक अडकले बालेकिल्ल्यातच : बड्याचीवाडी मतदारसंघात चौरंगी तर हलकर्णी, भडगाव, नेसरी व गिजवणे गटांत तिरंगी लढती

राम मगदूम ल्ल गडहिंग्लजराष्ट्रवादीला रोखणे हेच सर्वांचे ध्येय असूनही तालुक्यातील सारेच नेते नेहमीप्रमाणे स्वत:च्या बालेकिल्ल्यांच्या डागडुजीमध्येच अडकून पडले. सोयीच्या राजकारणातून सोयीच्या आघाड्याच आकाराला आल्या. त्याचा लाभ कुणाला होणार? याकडेच लक्ष लागले आहे.बड्याचीवाडी गटात चौरंगी तर उर्वरित हलकर्णी, भडगाव, नेसरी व गिजवणे गटात तिरंगी लढती होत आहेत. पंचायत समितीमधील सत्ताधारी राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष नेसरी गटाचा अपवाद वगळता सर्व जागा स्वबळावर लढवत असून नेसरी गटातील पंचायत समितीच्या दोन्ही जागा काँगे्रसला सोडल्या आहेत. मात्र, नेसरीत राष्ट्रवादीबरोबर असणारी काँगे्रस नूल व गिजवणे गटात राष्ट्रवादीच्या विरोधात लढत आहे.जनता दलाचे ज्येष्ठ नेते श्रीपतराव शिंदे यांनी नूल गटाचा आग्रह शेवटपर्यंत सोडला नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीबरोबर त्यांचे जमले नाही. स्वाभिमानी, हत्तरकी व पताडे गटाबरोबर युती करून त्यांनी गडहिंग्लज तालुका विकास आघाडी स्थापन केली. मात्र, हत्तरकी गटाने ताराराणी आघाडीतर्फे अर्ज भरलेले उमेदवारच कायम ठेवले आहेत. त्यामुळे हत्तरकी नक्की कुणाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.पहिल्यांदाच भाजप जि.प.च्या ४ आणि पं.स.च्या ८ जागा लढवत आहे. उर्वरित भडगाव जि.प. आणि त्यातील भडगाव व महागाव गणाची जागा भाजपने ताराराणीला सोडली आहे. भाजपचे नेते प्रकाश शहापूरकर यांनी गिजवणे गटावरच लक्ष केंद्रीत केले आहे, तर प्रकाश चव्हाण यांनी भडगाव गटात अप्पी पाटील गटाशी युती केली आहे. मात्र, दोघांनीही समझोत्यातून दिलेले उमेदवार ताराराणी आघाडीच्या चिन्हावर लढणार आहेत.काँगे्रसचे किसनराव कुराडे व प्रदेश सरचिटणीस सुरेश कुराडे यांनी ‘गिजवणे’वर तर गडहिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी ‘बड्याचीवाडी’वर लक्ष केंद्रित केले असून, विद्याधर गुरबे यांनी पंचायत समितीच्या दोन जागांवर तडजोड करून ‘राष्ट्रवादी’शी ‘घरोबा’ केला आहे.शिवसेनेच्या संग्राम कुपेकर यांनीही आपल्या नेसरी गटावरच लक्ष केंद्रित केले आहे. नेसरी व बुगडीकट्टी गणात त्यांनी सेनेचे उमेदवार दिले असून, नेसरी गटाची जागा ते स्वत: लढवित आहेत. सेनेच्या स्नेहा मोरे बड्याचीवाडी गटाची जागा लढवत आहेत.