गडहिंग्लज :
शासनाच्या निर्देशाप्रमाणे गडहिंग्लज शहरातील गल्ल्या आणि वसाहतींची पारंपरिक जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणांना लोकशाही मूल्यांशी निगडित व थोर महापुरुषांची नावे देण्यात येणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी दिली.
गल्ल्या आणि वसाहतींची जुनी नावे व कंसात नवीन नावे : कुंभार गल्ली (संत गोरोबा कुंभार), नवीन कुंभार वसाहत (साने गुरुजी वसाहत), सुतार गल्ली (विश्वकर्मा वसाहत), कासार गल्ली (भगवान महावीर), ढोर वसाहत (बालाजी वसाहत), माळी गल्ली (संत सावतामाळी)
चांभार गल्ली (संत रोहिदास महाराज), न्हावी बोळ (संत सेना महाराज), वड्ड वसाहत (हनुमान गल्ली), बेरडवाडा (क्रांतिवीर उमाजी नाईक वसाहत), धनगर गल्ली (संत बाळूमामा), गवळीवाडा (श्रीकृष्ण नगर), इराणी वसाहत (एकता नगर), पिंजारी-अंबारी गल्ली (छत्रपती शाहू महाराज गल्ली)
नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या निर्णयानुसार नवीन नावे निश्चित करण्यात आली आहेत. लवकरच सर्व गल्ल्या व वसाहतींचे नामकरण करण्यात येईल, असेही प्रा. कोरी यांनी सांगितले.