शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज आठवडा बाजाराची जागाच बदलायला हवी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:21 IST

शिवानंद पाटील गडहिंग्लज : गडहिंग्लजला दर रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या बैठकीचे योग्य नियोजन नसल्यामुळे शहरातील मेन रोडसह बाजारपेठेतही बाजाराच्या ...

शिवानंद पाटील

गडहिंग्लज : गडहिंग्लजला दर रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या बैठकीचे योग्य नियोजन नसल्यामुळे शहरातील मेन रोडसह बाजारपेठेतही बाजाराच्या दिवशी वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे भाजी-फळ विक्रेत्यांसह अन्य फिरत्या विक्रेत्यांच्या बैठकीच्या जागेची पर्यायी व्यवस्था करायला हवी. यासाठी चर्च रोड हाच एकमेव पर्याय असून, शहरातील व्यापारी संघटना, पालिका व पोलिसांनी त्याचा विचार व नियोजन करण्याची गरज आहे.

सीमाभागातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून गडहिंग्लजची ओळख आहे. या ठिकाणी जनावरांचाही मोठा बाजार भरतो. त्यामुळे आजरा, चंदगडसह कर्नाटकातील शेतकरी, व्यापारी व ग्राहक गडहिंग्लजच्या बाजारात मोठ्या संख्येने येतात. येथे आठवडा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. परंतु, बाजाराच्या बैठकीचे योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे विक्रेते शहरातील विविध रस्त्यांवर ठिकठिकाणी बसतात. त्यामुळे म. दुं. श्रेष्ठी विद्यालय ते वीरशैव बँक, वीरशैव बँक, वीरशैव बँक ते नेहरू चौक, नेहरू चौक ते अहिल्याबाई होळकर चौक, महालक्ष्मी स्वीट मार्ट ते टिळक पथ, गंगा मेडिकल ते गुणे गल्ली, शिवाजी बँक ते कदम मेडिकल, कचेरी रोड आणि पाण्याच्या टाकीचा परिसर, साधना बुक स्टॉल ते बँक ऑफ इंडिया या रोडवर बाजार भरतो. दर रविवारी दसरा चौक ते मुसळे कॉर्नरपर्यंतची वाहतूक बंद राहते. त्याचबरोबर बाजार भरणाऱ्या सर्व रस्त्यांवरदेखील सायकल व दुचाकीदेखील नेता येत नाही. म्हणूनच बाजाराचे पर्यायी नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

...........................

अशी करता येईल पर्यायी व्यवस्था

शानभाग हॉस्पिटल ते कडगाव रोडवरील भगवा चौकपर्यंतचा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाजीविक्रेत्यांची व्यवस्था करता येईल. याशिवाय पोलीस ठाणे परिसर व चर्च रोडपासून दोन्ही बाजूंना जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर फळ, भाजीपाला, कापड विक्रेते, मसाले, चप्पल विक्रेते, आदींसह अन्य किरकोळ विक्रेत्यांची व्यवस्था करता येईल. त्यामुळे शहरातील मुख्य मार्गासह बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल.

.............................

* वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था

बाजाराच्या दिवशी पोलीस परेड मैदान, बॅ. नाथ पै विद्यालय मैदान व एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर या ठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केल्यास बाजारात कोठेही वाहतुकीची कोंडी होणार नाही.

............................

* बाहेरून येणाऱ्या प्रवाशांनाही सोयीचे

बाजारादिवशी मुसळे कॉर्नर ते अभिरुची स्वीट मार्टपर्यंतचा रस्ता चारचाकींसाठी बंद ठेवला जातो. त्यामुळे बाहेरून चारचाकींतून येणारे प्रवासी शहरातील कुठल्याही रस्त्यावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होते. पर्यायी व्यवस्थेमुळे बाहेरून येणाऱ्या वाहनधारकांनाही नेहमीप्रमाणे शहरातून बाहेर पडता येईल.

----------------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथील लक्ष्मी मंदिराकडे जाणारा रस्ता रविवारीच्या आठवडा बाजारादिवशी फळे, भाजीपाला विक्रेत्यांमुळे असा कोंडून गेल्याने रहदारीसाठी बंद होतो. (मज्जीद किल्लेदार)

क्रमांक : ०३०१२०२१-गड-०१/०२