शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

corona virus In Kolhapur : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात २०० बेडची सुविधा होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 15:34 IST

corona virus In Kolhapur : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात २०० बेडची आणि मुरगुड ग्रामीण रुग्णालयात ५० बेडची सुविधा करणे यासंदर्भातील निर्णयासाठी आज, मंगळवारी (२५) सकाळी ११ वाजता मुंबई येथे मंत्रालयात तातडीची बैठक होत आहे.त्यामुळे दोन्ही दवाखान्यांच्या दर्जा वाढीचा मार्ग मोकळा होणार आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात २०० बेडची सुविधा होणार ! मुंबईत बैठक : मुरगुड ग्रामीण रुग्णालयात ५० बेडची सोय

गडहिंग्लज: गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात २०० बेडची आणि मुरगुड ग्रामीण रुग्णालयात ५० बेडची सुविधा करणे यासंदर्भातील निर्णयासाठी आज, मंगळवारी (२५) सकाळी ११ वाजता मुंबई येथे मंत्रालयात तातडीची बैठक होत आहे.त्यामुळे दोन्ही दवाखान्यांच्या दर्जा वाढीचा मार्ग मोकळा होणार आहे.ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर आणि संबंधित सर्व खात्यांचे अपर सचीव, संचालक व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे.२००५ मध्ये तत्कालीन मंत्री बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नामुळे गडहिंग्लजला ७ एकर प्रशस्त जागेत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू झाले.त्यामुळे गडहिंग्लज, चंदगड,आजरा, भुदरगड,कागलसह सीमाभागातील गोरगरीब जनतेची मोठी सोय झाली.

याठिकाणी दररोज सुमारे ३०० बाहरूग्णांवर उपचार तर महिन्याला सुमारे १५० प्रसुती होतात. तथापि, गडहिंग्लज उपविभागातील सार्वजनिक आरोग्य सेवेच्या मर्यादा आणि वाढती रुग्णसंख्या विचारात घेता याठिकाणी २०० खाटांची सुविधा करावी आणि सीपीआरमध्ये मिळणाऱ्या सर्व सोयी- सुविधा गडहिंग्लजमध्ये उपलब्ध कराव्यात यासाठी आमदार राजेश पाटील यांनीही वर्षभर पाठपुरावा सुरू ठेवला होता.दरम्यान,ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनीही गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात २०० खाटांची सुविधा करण्याचे आश्वासन वेळोवेळी दिले होते.दोन दिवसांपूर्वीच झालेल्या कोरोना आढावा बैठकीत त्यांनी मुंबईत आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्याला मंजुरी मिळवून देण्याची ग्वाही दिली होती.त्यानुसार ही बैठक होत आहे.कोरोना काळात मोठा आधार ..!कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय हे कोवीड समर्पित रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे गोरगरिबांना मोठा आधार मिळाला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सीजन प्लांटही सुरू झाला आहे.त्याशिवाय सिटी स्कॅन मशिनसह आणखी एक ऑक्सिजन प्लांट व अद्ययावत सोयी - सुविधा उपलब्ध करण्याचे आश्र्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिली आहे.त्यामुळे या बैठकीकडे गडहिंग्लज विभागाचे लक्ष लागले आहे.मुरगुडमध्ये ५० खाटांची सोय !मुरगुड ग्रामीण रुग्णालयात सध्या ३० खाटांची सोय आहे. त्याठिकाणी ५० खाटांची  सोय करून अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्याचे आश्र्वासन मुश्रीफ यांनी दिले आहे.त्यालाही बैठकीत मंजुरी मिळणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर