पी. सी. पाटील गुरूजी गडहिंग्लज प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेला गतवर्षी दीड कोटीचा निव्वळ नफा झाला असून, सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येईल, अशी घोषणा संस्थाध्यक्ष सूर्यकांत चौगुले यांनी वार्षिक सभेत केली.
याप्रसंगी सेवानिवृत्त सभासद सुभाष निकम, भीमसेन पाटील, मल्लाप्पा खवरे, सोमगोंडा चिनगोंडा, सुरेश बागडी यांच्यासह विष्णू कुराडे, सागर बाणेकर, बसवराज अंकली यांचा सत्कार झाला.
चौगुले म्हणाले, मार्चअखेर संस्थेत ४६ कोटींच्या ठेवी असून, ३८ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. ५५ कोटींचे खेळते भांडवल असून, १३४ कोटींची वार्षिक उलाढाल झाली आहे.
चर्चेत मधुकर येसणे, दुंडाप्पा खामकर, सचिन पाटील, पुष्पावती दरेकर, रावसाहेब आंबूलकर, गणपत पाथरवट, बचाराम चौगुले, पांडुरंग सुतार, सुरेश हुली, कल्पना येसणे, राजेंद्र चौगुले, बाळासाहेब चौगुले, भरत शेळके, चंद्रकांत मुन्नोळी, प्रकाश पाटील, शरद देसाई, अय्याज बागवान, दिलीप पाटील, संगीता काळगे, विलास भोगाणे, आप्पासाहेब देवरकर, पांडुरंग भोईटे यांनी भाग घेतला.
सभेला शिक्षक नेते संभाजी जाधव, शंकर साळोखे व विलास जाधव यांच्यासह संचालक बाळासाहेब वालीकर, नंदकुमार वाइंगडे, संभाजी पाटील, विठ्ठल कदम, पांडुरंग कापसे, राजेंद्र सुतार, तानाजी जत्राटे, दिगंबर गुरव, विनायक पोवार, सखरू भोसले, अनिल बागडी, राजेंद्र मांडेकर, मधुकर जाभळे, शशिकला पाटील व मालूताई जाधव आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
सचिव सुधीर शिवणे यांनी नोटीस वाचन केले. संचालक भरमू कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष संदीप कदम यांनी आभार मानले.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे सेवानिवृत्तीबद्दल सुभाष निकम यांचा मधुकर येसणे यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी सूर्यकांत चौगुले, संदीप कदम, सुधीर शिवणे आदींसह संचालक उपस्थित होते.
क्रमांक : २५०६२०२१-गड-०३