शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

‘गडहिंग्लज’ची चळवळ राज्याला मार्गदर्शक

By admin | Updated: January 3, 2015 00:01 IST

सुरेश शिपूरकर : गडहिंग्लजला देहदान चळवळीचा वर्धापनदिन

गडहिंग्लज : गडहिंग्लजमधून सुरू झालेल्या देहदान चळवळीस शेजारच्या कर्नाटक व गोव्यातूनही प्रतिसाद मिळाला. हेच या चळवळीचे यश असून ही चळवळ राज्याला मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी केले.गडहिंग्लजच्या पहिल्या देहदात्या अनुराधा गोकाककर यांचा तिसरा स्मृतिदिन व देहदान चळवळीच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे होते.शिपूरकर म्हणाले, गडहिंग्लज ही अनेक चळवळींची भूमी आहे. व्यापक समाजहित व मानवतावादी भूमिकेतून काम करणारे कार्यकर्ते याठिकाणी आहेत. प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, ‘कसे जगावे व कसे मरावे’ हे गोकाककरांनीच गडहिंग्लजकरांना शिकविले.अनघा कुलकर्णी म्हणाल्या, गडहिंग्लजमधील पहिले देहदाते दाम्पत्य होण्याचा मान आपल्या आई-वडिलांना मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे. याप्रसंगी प्राचार्य जे. बी. बार्देस्कर, चंदूभाई दोशी, डॉ. एम. एस. बेळगुद्री, बाळेश नाईक, ऊर्मिलादेवी शिंदे, स्वाती कोरी, अकबर मुल्ला, शिवाजी होडगे, सुनील पट्टणशेट्टी, अंगद गोकाककर, आदींसह गोकाककर कुटुंबीय उपस्थित होते.यावेळी झेवियर क्रुझ, अशोक मोहिते व करमळकर गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष धुमे यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)देहदात्यांच्या नातेवाइकांचा सत्कारआजरा येथील स्व. ईश्वराप्पा भुसारी आणि हुक्केरी, गोकाक व गोवा येथील देहदात्यांच्या नातेवाइकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. संकल्पकांना प्रशस्तिपत्राचे वितरणदेहदानाचे संकल्पक झेवियर व रोझ कु्रझ, अशोक व उज्ज्वला मोहिते, प्रा. नवनाथ शिंदे, शारदा अजळकर, सुनंदा गुंडे, दत्तात्रय शिवगंड, आदींना प्रशस्तिपत्रे देण्यात आली.