शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज, इचलकरंजीत वकिलांची निषेध रॅली

By admin | Updated: September 12, 2015 00:52 IST

सर्किट बेंचचा प्रश्न : पूर्ततेसाठी जनरेटा वाढवू : शिंदे; न्यायमूर्ती मोहित शहा यांनी फसवणूक केल्याचा आरोप

गडहिंग्लज : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचप्रकरणी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी जनतेची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ गडहिंग्लज अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनतर्फे शहरातून निषेध फेरी काढण्यात आली.येथील तहसील कार्यालय व न्यायालयाच्या आवारातून फेरीला सुरुवात झाली. न्यायमूर्ती शहा यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावर फिरून फेरी नगरपालिकेच्या प्रांगणात आली. त्या ठिकाणी सभा झाली. जनता दलाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे म्हणाले, कोल्हापूर खंडपीठाची मागणी फार जुनी आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा होऊनदेखील न्याय मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. सर्किट बेंचची पूर्तता न झाल्यास जनरेटा वाढवावा लागेल.यावेळी नगराध्यक्ष राजेश बोरगावे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यान्नावर, जनता दल तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर, माजी सभापती अमर चव्हाण, श्रद्धा शिंत्रे यांची भाषणे झाली. मनसेच्या नागेश चौगुले यांनी त्याच ठिकाणी मुंडण करून घेऊन निषेध नोंदविला.यावेळी उपसभापती तानाजी कांबळे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, भाजप तालुकाध्यक्ष मारुती राक्षे, सरचिटणीस अनिल खोत, जिल्हा परिषदेचे सदस्य जयकुमार मुन्नोळी, शिवप्रसाद तेली, अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. बी. बी. घाटगे, उपाध्यक्ष अ‍ॅड. एस. व्ही. देसाई, सचिव अ‍ॅड. डी. बी. नागोंडा, अ‍ॅड. दशरथ दळवी, आदींसह महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, महिला व नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)सहा जिल्ह्यांची उद्या बैठकइचलकरंजी : येथे इचलकरंजी बार असोसिएशनच्यावतीने मोटारसायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. आर. एल. चव्हाण उपस्थित होते.न्यायालयाच्या इमारतीपासून निघालेली मोटारसायकल रॅली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून फिरविण्यात आली. यावेळी कॉँग्रेस, शिवसेना, भाजप, मराठा महासंघ, इचलकरंजी तालीम संघ, मनसे, शिवप्रतिष्ठान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मिरवणुकीचे नेतृत्व इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. एन. मुदगल यांनी केले. मिरवणुकीच्या सांगता सभेमध्ये अ‍ॅड. मुदगल यांनी कोल्हापूर बार असोसिएशनच्या रविवार(दि.१३)च्या सहा जिल्ह्यांच्या बैठकीस वकिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)