गडहिंग्लज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया जिल्हा कार्याध्यक्षपदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनिरुद्ध ऊर्फ पापा गाडवी यांची निवड झाली. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे. ----------------------
२) गडहिंग्लजमध्ये विकासकामांना प्रारंभ
गडहिंग्लज : शहरातील प्रभाग ८ मधील रस्ता डांबरीकरण, आरसीसी गटर आदी ६६ लाखांच्या विकासकामांचा नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, नगरसेविका सुनिता पाटील, शकुंतला हातरोटे, सुहास पावले, किशोर सुतार, मनोहर सुतार, कल्लेश नेवडे, सुरेश मगदूम, भैराण्णा मगदूम, शब्बीर मकानदार, सुरेश रेडेकर, राजू जाधव, श्रीकांत देसाई आदी उपस्थित होते.
------------------------- ३) गडहिंग्लजमध्ये ''फिट इंडिया'' साठी कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये पहिली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शाळा, क्रीडाशिक्षक व प्राथमिक शाळेचे केंद्र मुख्याध्यापक यांची संयुक्त बैठक आणि खेलो इंडिया व फिट इंडिया नोंदणीसाठी कार्यशाळा पार पडली. उपशिक्षणाधिकारी बी. एम. किल्लेदार, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबोगोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक एस. एन. देसाई, व्ही. आर. पालेकर आदींसह तालुक्यातील क्रीडाशिक्षक व केंद्रमुख्याध्यापक उपस्थित होते.
------------------------- ३) गडहिंग्लज हायस्कूलमध्ये एनसीसी कॅडेट भरती
गडहिंग्लज : शहरातील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये एनसीसी कॅडेटस् निवडप्रक्रिया पार पडली. ५६ मराठा बटालियनचे कमांडींग ऑफिसर उदय बारावरकर व प्रशासकीय मेजर सुभेदार नवगिरे परमजितसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया झाली. या प्रक्रियेत ६८ मुले व ३५ मुलींनी भाग घेतला. त्यापैकी १६ मुले व ९ मुलींची निवड करण्यात आली. याकामी राहुल मगदूम, विनायक नाईक, महेश पाटील, मुख्याध्यापक एस. एन. देसाई व सहकाºयांनी परिश्रम घेतले.