शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:18 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लजचे डीवायएसपी गणेश इंगळे यांनी येथील शिवराज विद्या संकुलास सदिच्छा भेट दिली. संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या ...

गडहिंग्लज : गडहिंग्लजचे डीवायएसपी गणेश इंगळे यांनी येथील शिवराज विद्या संकुलास सदिच्छा भेट दिली. संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते त्यांचा शाल व ग्रंथ देऊन सत्कार झाला. या वेळी सचिव प्रा. अनिल कुराडे, संचालक दिग्विजय कुराडे, विक्रम शिंदे उपस्थित होते. प्रा. अशोक मोरमारे यांनी आभार मानले.

गिजवणे येथील सुपरस्प्रेडर निगेटिव्ह

गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोनाचे संशयित सुपरस्प्रेडर म्हणून गावातील सर्व व्यापारी व कामगार मिळून ८५ जणांची अ‍ॅंटिजेन रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात गावातील सर्व किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, दूधविक्रेते, फळविक्रेते, पिठाची गिरणीचालक, पेट्रोल पंप कर्मचारी, हॉटेल व्यवसायिक व स्वीट मार्टचालक यांचा समावेश होता. तपासणीत सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे. वैदयकीय अधिकारी डॉ. गीता कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले‌. या वेळी सरपंच पौर्णिमा कांबळे, उपसरपंच नितीन पाटील, ग्रामसेवक डी. बी. कुंभार, तलाठी अजितसिंह किल्लेदार, पोलीस पाटील महादेव कुंभार आदी उपस्थित होते.

बातमी -३

मुख्याध्यापकांकडून भटक्या कुटुंबांना धान्यवाटप

गडहिंग्लज : चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा, हेरे, चंदगड, कोवाड परिसरात पोटासाठी आलेल्या ५० भटक्या कुटुंबांना मुख्याध्यापक बाबूराव वरपे यांनी स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. ते बेरडवाडा शाळेत कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कपडे, तांदूळ, साखर, रवा, बिस्किटे, साबण, सॅनिटायझर, हॅण्डवॉश आदी वस्तूंची मदत करून त्यांनी माणुसकी जपली.

बातमी -४

मृतांच्या वारसांना मदतीची मागणी

गडहिंग्लज : मुगळी (ता. गडहिंग्लज ) येथे पावसात पोल्ट्रीची भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या नांगनूर येथील मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.