कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या पाठोपाठ जिल्ह्णातील गडहिंग्लज आणि पेठवडगाव या दोन बाजार समितीवरही प्रशासक नेमले आहे. गडहिंग्लज बाजार समितीवर प्रशासक म्हणून ए. एच. भंडारे यांची तर पेठवडगाव बाजार समितीवर सुनील शिंगणकर यांच्या निवडीचा आदेश आज काढला. निवडीचा आदेश रितसर पोहोचल्यानंतर दोघेही कार्यभार स्वीकारणार आहेत. गडहिंग्लज आणि पेठवडगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत सन २०१३ मध्ये संपली. त्यानंतर निवडणूक लागणे अपेक्षित होते. मुदतवाढ मिळाली. दरम्यान, ७ नोव्हेंंबरला राज्यातील मुदत संपलेल्या सर्व बाजार समित्या सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बरखास्त केल्या. त्यानंतर संबंधित बाजार समितींवर प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली. गडहिंग्लज बाजार समितीवर प्रशासक म्हणून तेथील साहाय्यक निबंधक ए. एच. भंडारे यांची तर वडगाव बाजार समितीवर हातकणगंले येथील उपनिबंधक सुनील शिंगणकर यांची निवड केल्याचा आदेश येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने आज काढला आहे. त्यामुळे लवकरचे दोघेही प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारतील,असे जिल्हा उपनिबंधक प्रशासनाच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गडहिंग्लज, पेठवडगाव बाजार समितीवर प्रशासक नियुक्त
By admin | Updated: November 13, 2014 00:42 IST