शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘गडहिंग्लज पॅटर्न’ राज्यभर पोहोचेल

By admin | Updated: June 20, 2015 00:34 IST

विलास पाटील : कन्नड भाषिक विद्यार्थ्यांच्या समस्येबाबत संयुक्त बैठक

गडहिंग्लज : कानडी मातृभाषिक विद्यार्थ्यांच्या मराठी भाषा समृद्धीचा गडहिंग्लज तालुक्याचा विशेष उपक्रम यशस्वीरीत्या राबवूया. राज्यभर हा उपक्रम गडहिंग्लज पॅटर्न म्हणून राबविला जाईल, असा विश्वास ‘डाएट’चे प्राचार्य विलास पाटील यांनी व्यक्त केला.गडहिंग्लज पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे कानडी मातृभाषिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत आयोजित संयुक्त बैठकीत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांसह आजी-माजी शिक्षकांनी अनुभव कथनाबरोबरच उपाययोजनाही सुचविल्या. प्रा. डॉ. रमेश व्हसकोटी म्हणाले, मातृभाषेशिवाय अन्य भाषा शिकण्याची प्रक्रिया नैसर्गिक व सोपीच हवी. उच्चार व पाठांतराबरोबरच मराठी बोलण्याचा सराव करून घ्यायला हवा.ज्येष्ठ शिक्षक एकसंबे गुरुजी म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.माजी केंद्रप्रमुख आर. बी. पाटील म्हणाले, संवादात्मक व कृतीयुक्त अध्यापनाचा वापर करावा. परिसर भेटीतून मुलांना बोलते करावे. शिक्षकांनी आव्हान स्वीकारून काम केल्यास निश्चित यश मिळेल.राजेंद्र चौगुले म्हणाले, मुलांच्या भाषेत बोलल्यास त्यांच्या भावना समजतील. मनातील भीती दूर केल्यास त्यांना अध्ययानाची गोडी लागून उपस्थितीही वाढेल.सुमन जाधव म्हणाल्या, भाषिक अडचणीबाबत अंगणवाडी शिक्षिका व सेविकांचीही कार्यशाळा घ्यावी.पं. स. सदस्य अ‍ॅड. हेमंत कोलेकर म्हणाले, अध्यापनाच्यावेळी कन्नड-मराठी शब्दकोष वापरावा.पं. स.चे सदस्य बाळेश नाईक म्हणाले, भाषिक समस्येवर उपाय शोधण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.उपसभापती तानाजी कांबळे म्हणाले, सीमाभागातील मूलभूत समस्येवर उपाय शोधण्याच्या उपक्रमास सर्व प्रकारचे सहकार्य राहील. विस्तार अधिकारी रमेश कोरवी, जोतीबा पाटील, शशिकला पाटील, चंद्रकांत मुन्नोळी यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीस आजी-माजी शिक्षक उपस्थित होते. विस्तार अधिकारी बसवराज गुरव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)