शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

दाजीपूर, राधानगरी अभयारण्यात गिधाडे दुर्मीळ

By admin | Updated: May 16, 2017 01:23 IST

उन्हाळी प्राणी व पक्षी गणना : सर्वेक्षणात लाईन ट्रॅन्झिट व कॅमेरा टॅपिंग या दोन पद्धतीचा अवलंब

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दाजीपूर व राधानगरी अभयारण्यातील वन्यजीव क्षेत्रात केलेल्या उन्हाळी पक्षी व प्राणी गणनेत ‘गिधाडे’दुर्मीळ झाल्याची बाब समोर आली; तर दिवसा न दिसणारे लेपर्ड कॅट (वाघाटी), गेळा, खवले मांजर, उदमांजर (ब्राऊन सिवेट) ह्या दुर्मीळ जातींच्या प्राण्यांचे अस्तित्व दिसून आले. चार ते अकरा मे दरम्यान राधानगरी व दाजीपूर या अभयारण्यांच्या ३५ हजार १०० हेक्टर (३५१ स्क्वेअर किलो मीटर) क्षेत्रात करण्यात आलेल्या या गणनेत गवे, सांबर, भेकर, रानडुक्कर, अस्वल, ससे, वानर, शेकरू हे प्राणी प्रत्यक्ष दिसले आहेत. तर ज्या ठिकाणी मानवी अस्तिव राहू शकत नाही, अशा ठिकाणी बसविण्यात आलेल्या कॅ मेऱ्याद्वारेही गणना करण्यात आली. यात बिबट्या, रानकुत्रे, गवे, अस्वले, सांबर, भेकर, चौशिंग, तर लेपर्ड कॅट, गेळा, खवले मांजर, ब्राऊन सिवेट (उदमांजर) यांचे अस्तित्व दिसून आले. या गणनेत दोन्ही वनक्षेत्रांत प्रत्यक्ष दिसलेले प्राणी, पाऊलखुणा, विष्टा, झाडांवरील ओरखडे यांचा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्याचे काम वन्यजीव विभागाने सुरू केले आहे.लाईन ट्रॅन्झिट व कॅमेरा टॅपिंग या दोन आधुनिक पद्धतीचा अवलंब या गणनेत केला. यात दोन्ही अभयरण्यांत वन्यजीव विभागाचे ६५ कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी ही गणना केली. या सर्व क्षेत्रांत २४ मंच उभे करण्यात आले होते. यात रात्रंदिवस ही गणना करण्यात आली. घनदाट जंगलात बिबटे, अस्वल, गव्यांचे कळप, रानकुत्रे दिसले. पक्षी गणनेत मोर, धनेश, स्वर्गीय नर्तक, हार्नबेल, पानकोंबडे, सुतार पक्षी, बगळे, अशा नियमित पक्षांचे अधिवास दिसून आला. ही गणना मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्राणी व पक्षी गणनेत दाजीपूर व राधानगरी या दोन अभयारण्यांतून गिधाडे दुर्मीळ झाली आहेत. यासह नैसर्गिक चक्राप्रमाणे मांसभक्षक प्राणी वाढले की, शाकाहारी प्राण्यांचे प्रमाण कमी होते. त्यानुसार यंदा रानगव्यांचे प्रमाण वाढले आहे. गणनेसाठी ६५ कर्मचाऱ्यांसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. - सीताराम झुरे,विभागीय वन अधिकारी (वन्यजीव)