शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

भटक्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ गाढव मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 13:03 IST

भटका समाज मुक्ती आंदोलनातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘गाढव मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून शंखध्वनी करण्यात आला. या ठिकाणी काही काळ रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न आंदोलकांनी केला.

ठळक मुद्देशंखध्वनी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोकोचा प्रयत्न ‘महसूल’ने जमीन न दिल्याने ‘भटक्यां’ना हक्काचे घर नाही

कोल्हापूर : भटक्या विमुक्तांचे राहणीमान उंचावण्यासाठी सरकारने २०११ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणली; मात्र या योजनेसाठी महसूल विभागाने जमीन उपलब्ध करून दिली नाही, तर सामाजिक न्याय विभागानेही दुर्लक्ष केले; त्यामुळे ही योजना कागदावरच राहून आतापर्यंत भटक्या विमुक्तांसाठी एकही घर उभे राहिलेले नाही. त्याच्या निषेधार्थ भटका समाज मुक्ती आंदोलनातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘गाढव मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून शंखध्वनी करण्यात आला. या ठिकाणी काही काळ रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न आंदोलकांनी केला.दुपारी बाराच्या सुमारास दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. फुलांचे हार घातलेले व अंगाला गुलाल लावलेली दोन गाढवं मोर्चाच्या अग्रभागी होती. जोरदार घोषणा देत हा मोर्चा व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्या ठिकाणी जोरदार घोेषणा देत, सरकारविरोधात शंखध्वनी करण्यात आला. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

घोषणा सुरू असताना अचानक काही आंदोलकांनी ठिय्या मारत रास्ता रोकोचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ त्यांची समजूत काढून वाहतुकीसाठी रस्ता खुला केला. यानंतर आंदोलकांनी तीव्र निदर्शने करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यानंतर शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.भटक्या विमुक्त समाजासाठी राज्य सरकारने २७ डिसेंबर २०११ ला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणली; परंतु त्याची आजतागायत अंमलबजावणी न झाल्याने अनेकजण हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित राहिले आहेत. तसेच रेशनकार्ड, जातीचे दाखले काढण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. जिल्हा प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून भटक्या विमुक्तांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. आंदोलनात भीमराव साठे, सुरेश जाधव, प्रदीप लोंढे, नंदकुमार साठे, संजय धोंगडे, रमेश जाधव, रेखा नंदीवाले, बेबीताई गोसावी यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी अध्यक्ष असूनही दुर्लक्षया योजनेचे जिल्हास्तरीय अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे व सचिव हे सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त आहेत. महसूल विभागाने जमीन उपलब्ध करून दिलेली नाही, तर सामाजिक न्याय विभागाने झोपेचे सोंग घेतलेय, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीMorchaमोर्चाkolhapurकोल्हापूर