शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

माजी संचालकांचे भवितव्य अंधकारमय?

By admin | Updated: February 28, 2015 00:21 IST

बेकायदा कर्जे : अपात्र ठरविण्यासाठी सहकार विभागाच्या हालचाली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे सर्वच माजी संचालक अडचणीत असले तरी सहकार विभागाला प्रतिज्ञापत्र सादर न केलेल्या २८ माजी संचालकांचे भवितव्य अंधकारमय बनले आहे. त्यांना निवडणुकीतून अपात्र ठरविण्यासाठी सहकार विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा बॅँकेच्या ४५ माजी संचालकांना सहकारमंत्र्यांनी मालमत्तेविषयीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. आपल्या मालमत्तेत त्रयस्थ हितसंबंध निर्माण होणार नाहीत, असे प्रतिज्ञापत्र मुदतीत सादर करायचे होेते; पण केवळ १८ माजी संचालकांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. उर्वरित माजी संचालक सहकारमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गुरुवारी (दि. २६) यावर सुनावणी झाली असून, याबाबतचा निकाल मंगळवारी (दि. ३) होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सहकार विभागाने प्रतिज्ञापत्र सादर न केलेल्या माजी संचालकांवर कारवाईस सुरुवात केली आहे. मालमत्तेविषयी प्रतिज्ञापत्र विहित वेळेत सादर न केल्याने त्यांच्या मालमत्ता जप्ती कारवाईच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. १४७ कोटी वसुलीबरोबर माजी संचालकांना सहा वर्षे कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरविण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. माजी संचालकांमध्ये स्थानिक संस्थांसह तालुका व जिल्हा पातळीवरील सहकारी संस्थांत काम करणारी बहुतांश मंडळी आहेत. केवळ जिल्हा बॅँक व ‘गोकुळ’मध्येच हे संचालक कार्यरत नाहीत. विविध बॅँका, सूतगिरण्या, खरेदी-विक्री संघ, साखर कारखाने, आदी ठिकाणी संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. सहा वर्षे निवडणूक बंदीची कारवाई झाली तर माजी संचालकांसमोरील अडचणी वाढणार, हे निश्चित आहे. त्यांचे वारसदार जरी निवडणूक रिंगणात उतरले तरी नेत्यांएवढी ताकद लागेलच, असे सांगता येत नाही. त्यातच तेवढ्या ताकदीचे कार्यकर्ते मिळणे अवघड; मिळाले तर त्यांच्या राजकीय वर्चस्ववादाचा मुद्दाही पुढे येणार असल्याने पेच निर्माण होऊ शकतो. (प्रतिनिधी)