शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

धगधगतं शिवार...

By admin | Updated: June 1, 2017 23:25 IST

धगधगतं शिवार...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जगाचा पोशिंदा जेव्हा उपाशीपोटी रस्त्यावर उतरला, तेव्हा त्याच्या धगधगत्या शिवाराची दाहकता जाणवली सर्वसामान्यांना. गुरुवारी सातारा जिल्ह्यातील बळीराजानंही दिला जोरदार झटका. भाजीविना... दुधाविना. मात्र, दुधाची नासाडी न करण्यावर भर देत दाखविली शेतकऱ्यांनी माणुसकी... तर कुठं भरल्या पिकात सोडलं बांधावरच्या शेळ्यांना. मनावर दगड ठेवत. डबडबत्या पापण्यांमधले थेंब हळुवारपणे पुसत. ‘लोकमत टीम’नं टिपली हिच ती बळीराजाच्या संपाची विलक्षण कहाणी....घावली रंऽऽ गाडी... हाण त्याला !कऱ्हाड : शेतकरी संघटनेचं वर्चस्व असलेल्या कऱ्हाड तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यकर्त्यांनी हा संप भलताच मनावर घेतल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. शेतीचा माल घेऊन चाललेल्या गाड्या दिसल्या की संघटनेचा झेंडा फडकवत हे कार्र्यकर्ते तुटून पडायचे. शिक्षण घेऊनही बेरोजगार असलेल्या या कार्यकर्त्यांनी ‘अस्सल गावरान हिसका’ दाखवायलाही मागंपुढं पाहिलं नाही. अशा कार्यकर्त्यांना हुडकून ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची दिवसभर भलतीच तारांबळ उडाली होती. मलकापूर : भाजीपाला बाजारात पाठवायचा नाही, याचा निर्धार केलेल्या बळीराजाच्या शिवारातला माल खराब होऊ शकतो, हे ओळखून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव जनावरांना थेट पिकात सोडलं. कऱ्हाड तालुक्यातील कापील गावचे शेतकरी भाऊसाहेब जाधव यांनी आपल्या शेतात भेंडी पिकविली आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्या वेळापत्रकानुसार भेंडीची तोड होती. परंतु संपात सहभागी झालेल्या भाऊसाहेबांनी भेंडी न तोडताच तशीच रोपांवर लगडू दिली. त्यानंतर आपल्या शेळ्यांना बिनधास्तपणे भेंडीच्या रानात सोडलं. नेहमी बांधावर चरणाऱ्या शेळ्यांनाही मालकाच्या भूमिकेचं आश्चर्य वाटलं असावं.. कारण एक पाऊल जरी रानात पडलं तरीही बाहेर हाकलणारा मालक आज आपल्याला चक्क ताज्या भेंडीची पार्टी देतोय, हे त्यांच्यासाठी धक्कादायकच होतं. व्यापारी मात्र हळूच हसला...सातारा : बळीराजाचा संप पूर्वनियोजित असल्याने ग्रामीण भागातून भाजीपाला आलाच नाही. सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी आलेल्या कृषिमालाचा गुरुवारी लिलाव झाला. मात्र, प्रमाण कमी असल्याने व्यापाऱ्यांनी शिल्लक माल बाहेर काढून चढ्या दराने विक्री केली. आगामी तीन-चार दिवस पुरेल एवढा भाजीचा साठा अनेक व्यापाऱ्यांनी केल्याचे मार्केटमध्ये स्पष्ट झाले.टोमॅटो विकणाऱ्या एका तरुण व्यापाऱ्याच्या पाठीमागे वेगवेगळ्या भाजीने भरलेले अनेक ट्रे ग्राहकांना दिसून आले. संप मिटेस्तोवर पोराबाळांना दूध-तूप खाऊ घालणार हाय..लोकमत न्यूज नेटवर्कतांबवे : कऱ्हाड तालुक्यातील तांबवे परिसरात दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त. दिवसभर घाम गाळून गोळा केलेलं दूध रस्त्यावर ओतून देतानाची दृश्यं टी. व्ही. चॅनेल्सवर पाहताना अनेकांना होतंय तीव्र दु:ख. यामुळं संप मिटेपर्यंत आपल्या घरातल्या पोराबाळांना भरपूर दूध, तूप खाऊ घालण्याचा निर्धार केलाय इथल्या शेतकऱ्यांनी. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना दूध उत्पादक शेतकरी विकास पवार म्हणाले की, आमच्याकडे दुधाची जनावरे जास्त आहेत. दररोज दहा लिटर दूध घातले जाते. मात्र, संपामुळे दूध घरीच आणले आहे. संपामुळे पोराबाळांस्नी दूध भरपूर खायला मिळेल. दुधापासून पेढे, श्रीखंड, तूप बनवणार आहे.तसेच तांबवेचे शेतकरी शिवाजी पवार म्हणाले की, आमच्या मागण्या सरकार जोपर्यंत पूर्ण करीत नाही. तोपर्यंत आम्ही संपावर जाणार. सरकार नोकरदारांनी संप केला की लगेच त्यांच्या मागण्या मान्य करतंय आन शेतकऱ्यांस्नी मात्र दाद देत नाही. असं का? शेतामध्ये काहीच पिकलं नाहीतर लोक काय पैका खाणार आहेत व्हयं. आमचा भाजीपाला, फळे, दूध खराब झाले तरी चालेल; पण आम्ही संपात सहभागी होणार.गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे गावातील दूध संकलन केंद्र उघडण्यात आली खरी. मात्र, गावातील दूध उत्पादक शेतकरी या दूध केंद्राकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे अखेर दूध संकलनवाल्यांनी केंद्र बंद केली. ज्या शेतकऱ्याच्या घरी जनावरे आहेत. आणि दुधाची जनावरे भरपूर आहेत अशा शेतकऱ्यांनी आज दूध घरी नेऊन त्याचे बासुंदी, पेढे, श्रीखंड, तूप करणार असल्याचे सांगितले.