शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रामचंद्र माने यांच्यावर आज अंत्यसंस्कार

By admin | Updated: February 1, 2017 00:20 IST

सैनिकी परंपरा जपलेल्या रामपूरवाडीचा जवान हरपला : पहिल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये सहभाग

लखन घोरपडे --देशिंग --कवठेमहांकाळ शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले सुमारे शंभर लोकवस्तीचे रामपूरवाडी हे गाव, जवान रामचंद्र शामराव माने यांच्या सीमेवरील बलिदानानंतर सुन्न झाले आहे. देशसेवा बजावत असताना माने हिमस्खलनात शहीद झाल्याची बातमी सोमवारी गावात समजताच रामपूरवाडीसह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता लष्करी इतमामात माने यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.शंभरावर लोकवस्ती असलेल्या रामपूरवाडीतील २९ सैनिक सध्या देशसेवा बजावत आहेत, तर २७ जण देशसेवा संपवून निवृत्त झाले आहेत. सैनिकी परंपरा असलेल्या या गावातील जिगरबाज जवान रामचंद्र माने शहीद झाल्याने वातावरण भावूक दिसून येत होते. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आई सुलाबाई यांनी मोठ्या कष्टातून मोठा मुलगा भानुदास यांना सैन्यात भरती केले. दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या गावात शेती परवडत नसल्याने रामचंद्र २००१ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच कवठेमहांकाळ येथे लष्करात भरती झाले. त्यांच्यापाठोपाठ लहान भाऊ अनिलही सैन्यातच दाखल झाला आणि माने कुटुंबातील तीनही भाऊ देशसेवेत दाखल झाले.गतवर्षी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये रामचंद्र माने यांचा सहभाग होता. रामचंद्र शहीद झाल्याचे वृत्त येताच संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. थोरले बंधू भानुदास गतवर्षी जुलै महिन्यात निवृत्त झाले आहेत. रामचंद्र दिवाळीदरम्यान गावी येऊन गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुरेखा, मुले संकेत व रोहन, मोठा भाऊ भानुदास, लहान भाऊ अनिल, आई सुलाबाई असा परिवार आहे.सकाळी नऊ वाजता अंत्ययात्राशहीद जवान रामचंद्र माने यांचे पार्थिव बुधवारी सकाळी सात वाजता लष्कराच्या हेलिकॉप्टरने कवठेमहांकाळ येथे आणण्यात येणार आहे. तेथून सकाळी नऊ वाजता रामपूरवाडी येथे गावी ते आणले जाणार आहे. गावातून सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. घरापासून काही अंतरावर शहीद माने यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सैनिक कल्याण निधीचे अध्यक्ष प्रदीप ढोले उपस्थित राहणार आहेत.मुलांना अधिकारीच बनविणार!शहीद रामचंद्र माने यांचा मुलगा संकेत तिसरीत, तर रोहन पहिलीत आहे. दोघेही सातारा येथील सैनिकी शाळेत शिकत आहेत. मी सैन्यात शिपाई असलो तरी, माझी मुले अधिकारी बनविणार, अशी रामचंद्र यांची जिद्द होती. ती आम्ही पूर्ण करणारच, अशी प्रतिक्रिया त्यांचे भाऊ भानुदास यांनी दिलीफलक उभारून गावकऱ्यांची आदरांजलीजिद्दीच्या जोरावर सैन्यात भरती होऊन देशसेवा बजावत असताना शहीद झालेल्या माने यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘रामचंद्र माने अमर रहे’ असे फलक गावात लावण्यात आले आहेत.