कोरडवाहू गाव म्हणून तेऊरवाडीची शासनाकडे नोंद आहे. असे असले तरीही यापूर्वी कै. नरसिंगराव पाटील यांनी पिण्याच्या पाणी योजनेसह कोट्यवधी विकासकामे केली आहेत. अजूनही येथे शेतीच्या पाण्याचा प्रश्न व जंगली प्राण्यांचा उपद्रव सुरू असल्याने यासाठी तेऊरवाडीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार राजेश पाटील यांनी दिले. तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे नवीन वसाहतीतील आमदार फंडातून मंजूर झालेल्या रस्ता कामाच्या उद्घाटप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सुगंधा कुंभार होत्या.
आमदार पाटील म्हणाले, सर्वांनी विकासाला साथ देणे गरजेचे आहे. तालुक्यात शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागत आहे. पाटणे फाटा येथील आरोग्य केंद्राचा प्रश्नही लवकरच सुटेल. गवे व हत्तींच्या उपद्रवासंदर्भात वनविभागाला सूचना दिल्या आहेत. तेऊरवाडीतील शेतीसाठी घटप्रभा नदीवरून पाणी आणण्यासाठी अशोक पाटील प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील. आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या विनोद पाटील याचा आमदार पाटील यांच्याहस्ते सत्कार झाला.
यावेळी अशोक पाटील, एस. एल. पाटील, उपसरपंच शालन पाटील, राजेंद्र भिंगुडे, बजरंग पाटील, सुनील पाटील, संगीता पाटील, गुरुनाथ पाटील, दत्तात्रय पाटील, मारुती पाटील, एन. व्ही. पाटील, नरसू पाटील, विजय पाटील, विष्णू आढाव, राकेश पाटील, सुबराव पाटील, केदारी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------------------
* फोटो ओळी : तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे आमदार राजेश पाटील यांनी रस्ता कामाचे उद्घाटन केले. यावेळी अशोक पाटील, प्रा. गुरुनाथ पाटील, आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०१०२२०२१-गड-०५